हजारो कोटींच्या ठेवी हाच मुंबई महापलिकेचा आधार, आर्थिक मंदीचा फटका उत्पन्न घटले !!!

राज्य सरकारकडून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) या माध्यमातून मिळणारी रक्कम 2022 पर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर मात्र ही रक्कम मिळणार नाही. त्यामुळे त्या रकमेसाठी पर्यायी स्रोत निर्माण करावा लागणार आहे. पालिकेने ज्या विविध बॅंकांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत, त्या ठेवींमधील काही रक्कम तीन वर्षांपासून प्रशासन मोठ्या प्रकल्पांसाठी काढत आहे. या ठेवींवरील व्याजावर किती वर्षे अवलंबून राहायचे, असा सवाल विरोधी पक्षांतील सदस्यांनी उपस्थित केला आहे.
 हजारो कोटींच्या ठेवी हाच मुंबई महापलिकेचा आधार, आर्थिक मंदीचा फटका उत्पन्न घटले !!!

मुंबई : मुंबई महापालिकेला दोन वर्षांपासून आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठे प्रकल्प कसे मार्गी लावायचे, असा प्रश्‍न पालिकेपुढे निर्माण झाला आहे. बॅंकांमध्ये असलेल्या 69 हजार कोटी रुपयांच्या ठेवी हाच पालिकेचा सध्याचा मोठा आर्थिक आधार आहे. नव्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना ठेवींच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून अर्थसंकल्प समतोल करण्यासाठी आकड्यांचा खेळ केला जाण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

किनारी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, गारगाई पिंजाळ प्रकल्प आदी महत्त्वाचे मोठे प्रकल्प महापालिकेने सुरू केले आहेत. जकात बंद झाल्याने पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत घटला आहे. मालमत्ता करापोटी मिळणारा महसूल आणि विकास निधीही कमी झाला आहे. आर्थिक मंदीचा फटका बसू लागल्याने मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासणार आहे. विकास नियोजन खात्याच्या महसुलावरही मंदीचा परिणाम झाला आहे. देशातील सर्वांत श्रीमंत असलेली मुंबई महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. 

राज्य सरकारकडून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) या माध्यमातून मिळणारी रक्कम 2022 पर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर मात्र ही रक्कम मिळणार नाही. त्यामुळे त्या रकमेसाठी पर्यायी स्रोत निर्माण करावा लागणार आहे. पालिकेने ज्या विविध बॅंकांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत, त्या ठेवींमधील काही रक्कम तीन वर्षांपासून प्रशासन मोठ्या प्रकल्पांसाठी काढत आहे. या ठेवींवरील व्याजावर किती वर्षे अवलंबून राहायचे, असा सवाल विरोधी पक्षांतील सदस्यांनी उपस्थित केला आहे. 

मालमत्ता करमाफीच्या घोषणेचा फटका 
मुंबईतील 500 चौरस फुटांच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा मालमत्ता करावर परिणाम झाला आहे. 500 चौरस फुटांच्या आतील घरांपोटी मिळणारा मालमत्ता कर आता थांबणार आहे. याची कसर कशी भरून काढायची असा प्रश्‍न पालिकेपुढे निर्माण झाला आहे. मालमत्ता करमाफीच्या घोषणेचा मोठा परिणाम पालिकेच्या महसुलावर झाला आहे, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com