Mumbai mayor election | Sarkarnama

मुंबईत भाजपचाच महापौर : खडसे 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडून येईल, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

नागपूर : मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर निवडून येईल, असे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. यासाठी आवश्‍यक असलेल्या संख्याबळाची माहिती मात्र त्यांनी देण्याचे टाळले. 

भोसरी येथील भूखंड गैरव्यवहारप्रकरणी सुरू असलेल्या न्या. झोटिंग समितीसमोर हजर राहण्यासाठी ते आज नागपुरात आले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ""मुंबई महापौर कोण होईल, याबाबत चर्चा सुरू आहे. परंतु मुंबईच्या महापौरपदी भाजपचा नगरसेवक राहील.'' 

नोटाबंदीचा कोणताही परिणाम मतदारांवर झालेला नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ""नोटाबंदीच्या निर्णयावर विरोधकांनी वादळ उठविले होते. राज्यात झालेल्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. नोटाबंदीचा कोणताही परिणाम लोकांवर झाला नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख