पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

बांधकाम विभागाने केली चौकशी सुरू..
aditya zumbar
aditya zumbar

मुंबई : मुंबईत अनेक शासकीय बैठका होत असलेल्या सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Guesthouse) मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लँबसह कोसळले. आज संध्याकाळी ४.४५ वाजता सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकार्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लँबसह कोसळले.

अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दुर्घटना जीवघेणी होती. त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या.  आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व अधिकार्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले. हे बांधकाम 20 ते 25 वर्षांपूर्वीचे आहे. त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक व्हीआयपींची येथे नेहमीच वर्दळ असते. तेथे असा प्रकार घडल्याने यंत्रणांची पळापळ झाली आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी या प्रकाराची चौकशी करत आहेत. याची तातडीने दुरुस्ती केली जाईल, असे सांगण्यात आले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनेक बैठका याच अतिथिगृहात होतात. तसेच महाविकास आघाडीच्या अनेक मंत्रीही येथे अनौपचारिक पद्धतीने भेटत असतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com