मनसुख हिरेन हत्या आणि सचिन वाझे तपासाला वेगळेच वळण... प्रमुख अधिकाऱ्याची बदली

तपास महत्वाच्या टप्प्यावर असताना बदलीचे कारण काय?
nia officers
nia officers

मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची स्फोटक प्रकरणी सुरू असलेली चौकशी आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासात वेगळीच घडामोड घडली आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे आहे. या तपासावर लक्ष ठेवून असलेले एनआयएचे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती झाली आहे.

महत्वाच्या प्रकरणाच्या तपासातील अधिकारी शक्यतो बदलले जात नाहीत. तरी शुक्ला यांची बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यांना मिझोराम येथे पाठविण्यात आले आहे. रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवण्याचे प्रकरण असो की हिरेन हत्या या दोन्ही तपासांवर शुक्ला यांचा सहभाग होता. यात महाराष्ट्र पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांची चौकशी करण्यामध्ये शुक्ला यांची महत्वाची भूमिका होती. सचिन वाझेला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक करण्यापासून ते इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यातील सहभाग तपासणे ही किचकट बाब शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील टिमने केली. त्यात मोठे यश मिळत असताना त्यांची बदली साहजिकच चर्चेचा विषय झाली आहे.

API रियाज काझी सेवेतून निलंबित 

एनआयएने वाझेला साथ देणारा दुसरा API रियाज काझी याला अटक केली होती. ॲंंटिलीया स्फोटक प्रकरण आणि मानसुख हिरण हत्याप्रकरणात काझीचा सहभाग आढळून आला होता.या प्रकरणात काझीला NIA ने अटक केल्यानंतर काझी वर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. काझी सध्या सशस्त्र पोलिस दलात कार्यरत होता. या गुन्ह्या दरम्यान वाझेसोबत तो तपास अधिकीरी म्हणून काम करत होता. काझीवर या प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वाझे आणि काझी हे 6 मार्चला एका ऑडी गाडीतून नागपाडा परिसरात गेले होते. 4 मार्च तारखेला मनसुखची हत्या करण्यात आली आणि त्यांनतर 6 तारखेला वाझे आणि काझीने नागपाडा परिसरात एका व्यक्तीची भेट घेतली आणि त्याच्याकडून एक बाटली पेट्रोल आणि हातोडी घेतली होती. NIA च्या तपासादरम्यान एका मर्सिडीजमध्ये एक पेट्रोलची बाटली सापडली होती तर एका वोल्वो गाडीतून हातोडी जप्त करण्यात आली होती. नागपाडा परिसरातून त्या व्यक्तीकडून घेतलेल्या या हातोडीचा वापर डिव्हीआर आणि इतर साहित्याची तोडफोड करण्यासाठी झाला असावा, असा NIA ला संशय आहे. नागपाडा परिसरातल्या ज्या व्यक्तिकडून हे साहित्य वाझे आणि काझीने घेतले होते त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. 

अनिल देशमुखांना चौकशीसाठी समन्स

माजी गृहमंत्री यांना अपेक्षेप्रमाणे सीबीआयचे चौकशीसाठी समन्स आले आहे. येत्या बुधवारी (ता. 14) त्यांना सीबीआयसमोर आपली बाजू मांडायची आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होणार आहे.

उच्च न्यायालयाने या प्रकरणी सीबीआयला पंधरा दिवसांत चौकशी पूर्ण करून नंतर पुढील कारवाई करण्यास सांगितले आहे. त्यानुसार या प्रकरणातील संबंधितांचा जबाब सीबीआय नोंदवून घेत आहे. खुद्द परमबीरसिंग यांची चौकशी सीबीआयने केली आहे. याशिवाय ज्यांच्याकडे देशमुख यांनी शंभर कोटींची मागणी केली त्या अधिकाऱ्यांचाही जबाब सीबीआयने नोंदविला आहे. या प्रकरणातील मुख्य चेहरा असलेले सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांची चौकशी एनआयए कोठडीतच सीबीआयने पूर्ण केली. याशिवाय सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील, देशमुख यांचे स्वीय सहायक संजय पलांडे, कुंदन यांनाही सीबीआयने चौकशीसाठी बोलविले होते. या सर्वात शेवटी आता अऩिल देशमुख यांची चौकशी होणार आहे. या चौकशीच्या विरोधात अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र त्यांना दिलासा मिळू शकला नाही. यासंदर्भात वकील जयश्री पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका करून सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com