...तर वीज कंपनीला झटका देऊ : राज ठाकरेंचा इशारा

मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिले पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेचे बिल यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत. त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावे लागेल, असे राज म्हणतात
MNS Chief Raj Thackeray Warns Electricity Company over Huge Bills
MNS Chief Raj Thackeray Warns Electricity Company over Huge Bills

मुंबई  : राज्याला महसुलाची अडचण आहे हे सर्वाना मान्य आहे. म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणे हा मार्गच असू शकत नाही. या विषयात मुख्यमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालावे आणि सामान्यांना वीजबिलात तत्काळ सूट द्यावी. तसेच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल न करण्याचे आदेश वीज कंपन्यांना द्यावेत. अन्यथा या खासगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. 

याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना पत्र लिहिले आहे. 'महावितरण, बेस्ट, खासगी कंपन्यांनी राज्यातील वीज ग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. या कंपन्यांनी वीजबिलात तत्काळ सूट द्यावी. तसेच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थपानांना तत्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी. अन्यथा या कंपन्यांना झटका द्यावा लागेल,' असे राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. 

राज्यातील वीज कंपन्यांनी सध्याच्या संकटाच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढीव बिल आकारणी केल्याने नागरिकांमध्ये अस्वस्थतात आहे. या पार्श्‍वभूमीवर राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. 'कोरोनाच्या लढाईत बहुदा राज्य सरकारचे एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होते. या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचे लक्ष वेधून घेऊ इच्छिते. खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची बिले ग्राहकांना पाठवली गेली आहेत ती सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत,'' असेही राज यांनी या पत्रात म्हटले आहे.

ही तर जनतेची लूट
मार्च, एप्रिल, मे ह्या तीन महिन्यांची सरासरी वीज बिले पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेचे बिल यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात आली आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत. त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावे लागेल, असे राज म्हणतात. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापना, व्यवसाय देखील गेली ३ महिने बंद होते, तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिले आकारली गेली आहेत. अनेकांना उदरनिर्वाहाची शाश्वती नसताना ही वीजबिले म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणे आहे, असेही राज यांनी म्हटले आहे.

Edited BY - Amit Golwalkar
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com