नव्याने झालेल्या विधान परिषदेच्या नऊ आमदारांत अमोल मिटकरी ठरले `गरिब`

विधान परिषद निवडणुकीत अर्ज भरणाऱ्या उमेदवारांत मिटकरी हे `गरिब` ठरले आहेत..
amol mitkari
amol mitkari

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार अमोल मिटकरी यांची स्थावर मालमत्ता ५३ लाख रूपये इतकी आहे. यामध्ये चार एकर शेतजमीनीसह, बांधलेली जागा व माेकळ्या प्लॉटचा समावेश आहे.

या निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्वाधिक श्रीमंत म्हणजे 150 कोटी रुपयांहून अधिक त्यांची मालमत्ता आहे. इतरही उमेदवार कोट्यधीश आहेत. मिटकरी हे लखोपती आहेत. त्यामुळे ते गरिब ठरले आहेत. 

सोने, एलआयसी पॉलिसी व बँक डिपॉझिट या स्वरूपातील जंगम मालमत्ता ५२ लाख २९ हजार ६४० रूपयांची आहे. त्यांच्यावर १७ लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज आहे. कृषी कर्ज,वाहन कर्ज तसेच गृह कर्जाचा यात समावेश आहे. गेल्या अर्थिक वर्षात प्राप्तीकर खात्याकडे दाखविलेले उत्पन्न केवळ ३ लाख ४२ हजार ६१९ रूपये आहे.

अकोला हे मिटकरी यांचे गाव आहे. अकोल्यातील युनियन बँकेकडून त्यांनी १० लाख ८५ हजार रूपयांचे गृह कर्ज घेतले आहे. एचडीयेफसी बँकेकडून वाहन कर्ज घेतले आहे. विधान परिषद निवडणूक लढविणारा उमेदवार आणि त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार म्हटले की मोठी मालमत्ता असलेला उमेदवार अशी पक्षाची प्रतिमा आहे. मात्र, मिटकरी यांनी सादर केलेले प्रतिज्ञापत्र पाहता पक्षाने अर्थिकदृष्ट्या सामान्य पण एका कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्याचे दिसते. निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मिटकरी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नव्या पिढीची मुलूख मैदानी तोफ अशी मिटकरी यांची ओळख आहे.पक्षातला नवा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या भाषणांनी मिटकरी यांनी निवडणुकीचे मैदान गाजवले होते. राज्यभर फिरून जास्तीत जास्त प्रचारसभा घेता याव्यात यासाठी पक्षाने त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरची सोय केली होती. या दोन्ही निवडणुकीत ते पक्षाचे स्टार प्रचारक होते. त्यामुळे कमी वयात त्यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. मुलूख मैदानी तोफ म्हणनू जरी पक्षाने त्यांना संधी दिली असली तरी अकाेला जिल्ह्यात पक्ष विस्ताराचे राजकारण त्यामागे असल्याचे सांगितले जाते. विधान परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीची चर्चा सुरू झाली. त्यावेळी मिटकरी यांचे नाव समोर आले.पक्षात स्पर्धेत अनेक दिग्गज नावांची चर्चा होती.मात्र, या साऱ्यातून मिटकरी यांचे नाव अंतिम करण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com