Sharad Pawar, Srinivas Patil; An inseparable thread of friendship | Sarkarnama

शरद पवार, श्रीनिवास पाटील; मैत्रीचा अतुट धागा

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 2 ऑगस्ट 2020

साताऱ्यातील प्रचारच्या सांगता सभेत भर पावसात शरद पवार यांनी छत्री नाकारली अन्‌ भाषण सुरू केले. त्यानंतर शरद पवार यांच्या काळजीखातर अचानक श्रीनिवास पाटील श्री. पवारांच्या जवळ येऊन उभे राहिले.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघातून हारण्याच्या भितीने कोणीही लढण्यास तयार नव्हते. अशात श्रीनिवास पाटील हे नाव पुढे आले आणि शरद पवारांच्या शब्दाखातर पाटील एका पायावर तयार झाले. समोर पराभव दिसत असताना, केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी श्रीनिवास पाटील यांनी ही निवडणूक लढवली अन्‌ विजयी झाले. यानंतर शरद पवार यांनी मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकीर केली नाही, असे माझे सवंगडी आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील असे उद्गार काढले होते. 

शरद पवार यांनी राष्ट्रवादीची पक्षाची निर्मिती केल्यावर शरद पवार यांच्या शब्दाखातर श्री. पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले. कराड लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात त्यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली.ही निवडणूक लक्षवेधी होती.

कराड हा चव्हाण कुटुंबाचा बालेकिल्ला समजला जात होता. त्यांचे वडील आनंदराव चव्हाण, आई प्रेमलाकाकी चव्हाण यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले होते. त्यामुळे यामतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचा टिकाव लागेल का, अशी चर्चा होती. पण श्री. पाटील यांनी गावोगावी प्रचारसभांतून केलेली रांगडी भाषणे लोकांना भावली. श्रीनिवास पाटील जिंकले. खासदार झाले.
 
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेसोबत सातारा लोकसभेची पोटनिवडणूक होती. या निवडणुकीत उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांच्यात लढत होती. यावेळी भर पावसात पवारांनी भाषण दिले त्यावेळी श्रीनिवास पाटिल ही भिजत होते. 80 व्या वर्षी श्रीनिवास पाटलांनी शरद पवार यांच्या मैत्रीखातर सातारा लोकसभेची निवडणूक लढविली. येथेही श्रीनिवास पाटील यांचाच विजय झाला.

 श्रीनिवास पाटील जिंकले तेव्हा शरद पवारांनी आपल्या जुन्या मित्रांचे (श्रीनिवास पाटील) तोंड भरून कौतुक केले. मैत्रीपुढे ज्यांनी कशाचीच फिकीर केली नाही, असे माझे सवंगडी आणि सातारा लोकसभा मतदारसंघाचे विजयी उमेदवार श्रीनिवास पाटील असे उद्गार शरद पवार यांनी काढले होते. यानिमित्ताने आमच्या मैत्रीच्या अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, असे सांगून शरद पवारांनी साताऱ्यातील विजयाचा आनंद व्यक्त केला होता. 

दोनवेळा लोकसभेचे माजी खासदार, संसदेत विविध समित्यांवर काम, जवळपास 35 वर्षे भारतीय प्रशासकीय सेवेत काम आणि त्यानंतर काही दिवस सिक्कीमचे राज्यपाल झाले. परंतु, आपल्या मित्राला सर्वच जण सोडून जात असताना साताऱ्याचे विद्यमान खासदारही विरोधी पक्षात सामील झाले होते.

 हारण्याच्या भीतीने कोणी लढण्यास तयार नव्हते. अशात श्रीनिवास पाटील हे नाव पुढे आले आणि शरद पवारांच्या शब्दाखातर एका पायावर ते तयार झाले. समोर पराभव दिसत असताना, कशाला हवीय निवडणूक? माजी राज्यपाल असल्याने राहिलेले आयुष्य सहज काढता आले असते. पण, केवळ आपल्या 80 वर्षाच्या मित्राच्या शब्दासाठी ही निवडणूक श्रीनिवास पाटील यांनी लढवली. 

साताऱ्यातील प्रचारच्या सांगता सभेत भर पावसात शरद पवार यांनी छत्री नाकारली अन्‌ भाषण सुरू केले. त्यानंतर शरद पवार यांच्या काळजीखातर अचानक श्रीनिवास पाटील श्री. पवारांच्या जवळ येऊन उभे राहिले. पवारसाहेब धो पावसात भिजतच बोलत होते. सगळ्यांच्या नजरा शरद पवार यांच्यावर होत्या, पण श्रीनिवास पाटील यांची ही कृती अधोरेखित करण्यासारखी होती. कारण, संकटातही खांद्याला खांदा लावून मित्रच उभा होता.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख