मुंबईच्या महापौर म्हणाल्या, ``आता कळालं दुसऱ्याच्या हातात मोबाईल का देऊ नये ते!`` - Mumbai Mayor clarifies about controversial tweet | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी

मुंबईच्या महापौर म्हणाल्या, ``आता कळालं दुसऱ्याच्या हातात मोबाईल का देऊ नये ते!``

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 3 जून 2021

नेटकऱ्याचा काढला होता बाप...

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) सध्या आपल्या ट्विटमुळे वादात पडल्या होत्या. त्या वादाबद्दल बोलताना त्यांनी ते ट्विट आपण केले नसल्याचा दावा केला आहे. लशींच्या ग्लोबल टेंडरबाबत प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने पेडणेकर लक्ष्य झाल्या होत्या. ‘ते ट्विट' आपण नाही तर शिवसैनिकाने केलं होतं’ अशी माहिती दिली आहे. (Mumbai Mayor clarifies about controversial tweet)

कार्यक्रमात असताना मी मोबाइल माझ्याकडे ठेवत नाही. माझ्या मोबाइलला लॉक नसतो. मोबाइल पाहत असताना शिवसैनिकाने हे ट्विट केलं होतं’, असं स्पष्टीकरण पेडणेकर यांनी दिलं आहे.  तो शिवसैनिकाचा राग होता, मात्र ते चुकीचेच आहे, त्या कार्यकर्त्याला समज दिली आहे. सर्व शहानिशा करूनच टेंडर दिले जाईल, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली. तसेच आता कळलं आपला मोबाईल दुसऱ्याच्या हातात देऊ नये असेही त्या म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर यांना मुंबईतील पत्रकार परिषदेत याबाबत प्रश्न विचारण्यात आला असता, बीकेसीत मी एका कार्यक्रमासाठी गेले होते. तसेच, ‘ते ट्विट ' पाहिल्यानंतर ही मोठी चूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. मी कधीही गैरवर्तन करत नाही. मी तात्काळ ते ट्विट डिलीट केलं आहे. तसंच त्या शिवसैनिकाला आईच्या मायेने बोलून "परत तुझ्या हातून असे गैरवर्तन होता कामा नये", असं सांगितलं’, असं पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

ही बातमी वाचा : पीए केअरच्या व्हेंटीलेटरमध्ये दोष नाही, फडणविसांचा दावा

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख