अनुरागला कठोर शिक्षा द्या : बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताची मागणी - Punish Anurag severely: Demand of Bengali actress Rupa Dutta | Politics Marathi News - Sarkarnama

अनुरागला कठोर शिक्षा द्या : बंगाली अभिनेत्री रुपा दत्ताची मागणी

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

 अनुराग कश्‍यप महिलांचा आदर करत नाही. पायल घोषने केलेले आरोप खरे आहेत. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच तो अमली पदार्थांचे सेवन देखील करतो. शिवाय आपल्या सहकलाकारांना अमली पदार्थ पुरवतो.  अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची चौकशी करावी, असे ट्‌विट करून तिने अनुरागवर निशाणा साधला.

मुंबई : दिग्दर्शक अनुराग कश्‍यपवर अभिनेत्री पायल घोष हिने लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणात बंगाली अभिनेत्री रुपा दत्ता हिने उडी मारली आहे. पायलने केलेले आरोप खरे असून अनुरागला कठोर शिक्षा व्हायलाच हवी, असे म्हणत तिने पायलला पाठिंबा दिला आहे.

रुपा दत्ताने ट्‌विटरवरून अनुरागवर टीका केली. अनुराग कश्‍यप महिलांचा आदर करत नाही. पायल घोषने केलेले आरोप खरे आहेत. त्याला कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच तो अमली पदार्थांचे सेवन देखील करतो. शिवाय आपल्या सहकलाकारांना अमली पदार्थ पुरवतो.

अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याची चौकशी करावी, असे ट्‌विट करून तिने अनुरागवर निशाणा साधला आहे. अनुराग नावाच्या व्यक्तीसोबतच्या संभाषणाचे काही फोटोही शेअर केले; परंतु त्यात त्याचे नाव अनुराग सफर असे दिसत असून त्याबद्दल अनेकांनी रुपाला सुनावले आहे. तिचे हे ट्‌विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख