नवरात्रौत्सवात यंदा गरबा, दांडियाला बंदी; गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना

देवीच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणूका काढू नयेत. विसर्जनाची आरती घरूनच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वयोवध्द नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाण्याचे टाळावे. चाळीतील, इमारतीत सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितपणे काढण्यात येऊ नयेत.
Garba, Dandiya banned this year during Navratri; Home Department Guidelines
Garba, Dandiya banned this year during Navratri; Home Department Guidelines

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवानंतर आता १७ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सव ही साध्या पध्दतीनेच साजरा करावा, तसेच नवरात्रीत गरबा, दांडिया खेळण्यास बंदी घालण्यात आली आहे. घरगुती देवींच्या मूर्ती दोन फुटांच्या तर सार्वजनिक मंडळांच्या देवींच्या मूर्ती चार फुटांच्या मर्यादेतच असाव्यात.तर मंडपात केवळ पाच व्यक्तींनाच थांबण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक मंडळांनी जनजागृतीविषयक उपक्रम राबवावेत, अशा मार्गदर्शक सूचना गृहविभागाने दिल्या आहेत. 

येत्या १७ ऑक्टोबरपासून सुरू होणा-या नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. राज्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा, दसरा हे सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन यांच्या धोरणानुसार पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.

मर्यादित स्वरुपातच मंडप उभारावा लागणार आहे. साध्या पध्दतीने
नवरात्रौत्सव साजरा करताना घरगुती तसेच सार्वजनिक देवींच्या मूर्तींची सजावट त्या पध्दतीने करायची आहे. देवीच्या मूर्तींची उंची सार्वजनिक मंडळांकरिता चार फुट व घरगुती देवींच्या मूर्तींची उंची दोन फुटांच्या मर्यादेतच असावी. शक्यतो पारंपारिक देवीच्या मूर्तींऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे.

मूर्ती शाडूची, पर्यावरण पूरक असल्यास तिचे विसर्जनही घरच्या घरी करावे. विसर्जन घरीच करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा. नवरात्रौत्सवासाठी वर्गणी, देणगी स्वच्छेने दिल्यासच स्वीकारावी. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच आरोग्य व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती द्यावी.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेबाबत देखील जागृती करावी. सार्वजनिक मंडळे व विविध संस्था यांनी गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आदी शिबीरे आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

आरती, भजन, किर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे पालन करावे. 
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. देवीच्या मंडपाचे निर्जंतूकीकरणाची तसेच थर्मल स्कॅनिंगची योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारिरीक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियमांचे पालन करावे.

 देवीच्या आगमन व विसर्जनाच्या मिरवणूका काढू नयेत. विसर्जनाची आरती घरूनच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले व वयोवध्द नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाण्याचे टाळावे. चाळीतील, इमारतीत सर्व घरगुती देवीच्या मूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितपणे काढण्यात येऊ नयेत. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी.

गर्दी टाळण्यासाठी प्रभागनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करण्यात यावी. मंडपात एका वेळी पाच पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास मनाई असेल. तसेच मंडपात खाद्यपदार्थ अथवा पेय पानाची व्यवस्था करण्यास मनाई असेल. प्रतिबंधित क्षेत्रात मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.

दसऱ्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम सर्व नियम पाळून प्रतिकात्मक स्वरूपाचा असावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक आदी समाज माध्यमातून थेट प्रक्षेपणाव्दारे बघण्याची व्यवस्था करावी, आदी नियम व सूचना गृहविभागाने केल्या आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com