महिला अत्याचारातील संशयितांना जामीन देऊ नका : चित्रा वाघ - Don't give bail to women abuse suspects Says BJP Leader Chitra Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

महिला अत्याचारातील संशयितांना जामीन देऊ नका : चित्रा वाघ

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 20 ऑगस्ट 2020

"महाविकास आघाडी महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही. महिला सुरक्षेबाबत अपयशी आहे. लैंगिक अत्याचारातील संशयितांनी अटी- शर्तींवर जामीन मिळत आहे. त्याचीही शहानिशा करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कऱ्हाड : कोरोना काळातील महिलांवरील अत्याचारातील संशयितांना जामीन दिला जाऊ नये. दिलेला जामीन रद्द करावा, यासाठी राज्य शासन व पोलिसांनी न्यायालयाला विनंती करावी, अशी मागणी भाजपच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली आहे. 

चित्रा वाघ कऱ्हाड दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "महाविकास आघाडी महिलांवरील अत्याचाराबाबत गंभीर नाही. महिला सुरक्षेबाबत अपयशी आहे. लैंगिक अत्याचारातील संशयितांनी अटी- शर्तींवर जामीन मिळत आहे.त्याचीही शहानिशा करण्याची गरज आहे.

छोट्या गोष्टीसाठी व्यक्त होणारे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही. राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत नवा कायदा आणायचा विचार करत आहे. त्याचे प्रारूप काय असणार त्याची स्पष्टता होणे गरजेचे आहे.'' 

कोरोनाचे कारण देत दिशा कायदा आणला जात नाही. कोरोना काळात अन्य शासन निर्णय होत आहे. मात्र, महिला सुरक्षेबाबतचा शासन निर्णय का घेत नाही, हाच खरा प्रश्न आहे. सरकार कोणाचेही असो महिला सुरक्षेचा प्रश्न सुटला पाहिजे, तो राजकारणाचा विषय होता कामा नये. त्यामुळे जोपर्यंत महिला अत्याचाराच्या घटना घडत राहतील. तोपर्यंत त्या घटना सरकारसमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख