पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे हा पाशवी दडपशाहीचा प्रयत्न : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत - Dalit families are not safe in Uttar Pradesh.Says Congress Minister Nitin Raut. | Politics Marathi News - Sarkarnama

पीडितेच्या कुटुंबीयांना भेटू न देणे हा पाशवी दडपशाहीचा प्रयत्न : उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 ऑक्टोबर 2020

अन्यायग्रस्त दलित कुटुंबांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते यापूर्वी गेले असता योगी सरकारने त्यांना अडवून भेटू न देण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. उत्तर प्रदेश मध्ये दलित कुटुंब सुरक्षित नसल्याची भावनाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

मुंबई : हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी जाणाऱ्या राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना अडवून योगी आदित्यनाथ सरकारने दडपशाहीचा प्रयत्न केल्याची टीका काँग्रेसचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. 

काँग्रेसचे राष्ट्रीय नेते व खासदार राहुल गांधी व नेत्या प्रियांका गांधी वधेरा यांना अडवून त्यांना धक्काबुक्की करून उत्तर प्रदेश पोलिसांनी खाली पाडले. राहुल गांधी व प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. मोदी व योगी आदित्यनाथ यांची ही पाशवी दडपशाही असल्याची टीका करून या वृत्तीचा राऊत यांनी निषेध केला आहे. 

हाथरस सारख्या घटना भाजपच्या राज्यात यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. तेथे जात असताना राहुल गांधी यांची पोलिसांनी कॉलर धरली व धक्काबुक्की करून जमिनीवर पाडले, ही घटना अतिशय निंदनीय असल्याची प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी व्यक्त केली आहे. अन्यायग्रस्त दलित कुटुंबांना भेटण्यासाठी काँग्रेसचे नेते यापूर्वी गेले असता योगी सरकारने त्यांना अडवून भेटू न देण्याचा प्रयत्न केला होता, याची आठवणही त्यांनी करून दिली आहे. उत्तर प्रदेशमध्ये दलित कुटुंब सुरक्षित नसल्याची भावनाही डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख