`हॉर्न`साठी आता साप्ताहिक सुटी - Mumbai-Horn-free-Day | Politics Marathi News - Sarkarnama

`हॉर्न`साठी आता साप्ताहिक सुटी

तुषार खरात
बुधवार, 6 डिसेंबर 2017

वाहनचालकांकडून वाजविले जाणा-या कर्णकर्कश हॉर्न्समुळे सगळ्यांनाच कमालीचा त्रास होतो. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने कमालीचे ध्वनीप्रदूषण होत असते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता एक दिवस हॉर्नला सुट्टी देण्याचा उपक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सुरू केला आहे. 

मुंबई : वाहनचालकांकडून वाजविले जाणा-या कर्णकर्कश हॉर्न्समुळे सगळ्यांनाच कमालीचा त्रास होतो. गरज नसतानाही मोठमोठ्याने हॉर्न वाजविल्याने कमालीचे ध्वनीप्रदूषण होत असते. हे प्रदूषण रोखण्यासाठी आता एक दिवस हॉर्नला सुट्टी देण्याचा उपक्रम राज्याचे गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी सुरू केला आहे. 

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. नाशिक पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात आठवड्यातून एक दिवस `नो हॉर्न` हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला नाशिककरांनीही चांगला प्रतिसाद दिला. 

या उपक्रमाबद्दल रणजीत पाटील यांनी नाशिक पोलिसांचे कौतुक केले. एवढचे नव्हे तर आता राज्यभरात मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, नवी मुंबई इत्यादी प्रमुख शहरांमध्ये या आठवड्यातून एक दिवस `नो हॉर्न` उपक्रम राबविण्याबाबत आदेश जारी केले आहेत.

मुंबईतील परिवहन विभागाने या उपक्रमाची जोरात अंमलबजावणीला सुरूवात केली
आहे. रस्त्यात जागोजागी उभे राहून स्वतः अधिकारी वाहनचालकांना हॉर्न
बंदीचे पत्रके देत आहेत. वाहनचालकही या अनोख्या उपक्रमाचे स्वागत करताना
अनेक ठिकाणी दिसत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख