Corona Alert : पहिल्या दहा हॉटस्पॉटमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्हे

महाराष्ट्रामध्ये काल२८ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
covid 19 The top 10 districts where maximum active cases are in maharashtra
covid 19 The top 10 districts where maximum active cases are in maharashtra

नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यातही सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे. तर एक जिल्हा कर्नाटकातील आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नागरिकांची चिंता वाढू लागली आहे. 

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाराष्ट्रामध्ये काल २८ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कोरोना रुग्ण वाढत असल्याने महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे भूषण यांनी सांगितले. देशातील पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव आणि अकोला या जिल्ह्यांचा समावेश होतो. तर कर्नाटकातील बेंगलुरू शहर सातव्या स्थानावर असल्याची माहिती भूषण यांनी दिली. 

देशात महाराष्ट्र आणि पंजाबमध्ये सर्वाधिक चिंताजनक स्थिती बनली आहे. तर गुजरात आणि मध्य प्रदेशातही रुग्णवाढ वेगाने होत असल्याची चिंता भूषण यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात मागील चोवीस तासात २४ हजार नवे रुग्ण आढळले आहेत. पंजाबमध्ये लोकसंख्येच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या खूप आहे, असे भूषण यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, काल राज्यात २८ हजार ६९९ नवे रुग्ण आढळून आले. तर १३ हजार १६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात कालपर्यंत एकूण २२ लाख ४७ हजार ४९५ बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७३ टक्क्यांवर पोहचले आहे. 

राज्याचा मृत्यूदर २.१२ एवढा आहे. लपर्यंत १ कोटी ८५ लाख नमुने तपासण्यात आले असून त्यामध्ये २५ लाख ३३ हजार नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ११ लाख ७७ हजार व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ११ हजार ८८७ रुग्ण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. एकुण २ लाख ३० हजार सक्रीय रुग्ण आहेत. 

काही जिल्ह्यांतील बाधित व सक्रीय रुग्ण
जिल्हा        एकूण बाधित         सक्रीय
पुणे         ४,८१,२१२        ४३,५९०        
नागपूर        २,०३,२९९        ३३,१६०
मुंबई        ३,६९,४५१        २६,५९९
ठाणे        ३,११,१९१        २२,५१३
नाशिक        १,५३,५०३        १५,७१०
औरंगाबाद    ७२,२९९            १५,३८०

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com