मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून वगळल्याने मुंबई महापालिकेतील गटनेते नाराज

मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होत आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातींमध्ये गटनेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे गटनेते नाराज झाले आहेत
Mumbai Corporation party leaders unhappy over administration
Mumbai Corporation party leaders unhappy over administration

मुंबई : मुंबई महापालिकेच्या विविध विकासकामांचे उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आज होत आहे. या कार्यक्रमाच्या जाहिरातींमध्ये गटनेत्यांची नावे नाहीत. त्यामुळे राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाले असून, गटनेते आणि समिती अध्यक्षांचा अवमान झाल्याचे गटनेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे. त्यांनी आपली नाराजी महापौरांना कळवली आहे.

सात रस्ता येथील संत गाडगे महाराज चौक ते केशवराव खाडे मार्ग (हाजी अलीच्या दिशेने) आणि संत गाडगे महाराज चौक ते ई. मोझेस रोड (धोबी घाट मार्ग, वरळी नाक्‍याच्या दिशेने) या दोन उड्‌डाणपूल, भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील आधुनिक दालने, भक्ती पार्क उद्यान येथे 'मियावाकी' उद्यानातील वनीकरण आदी प्रकल्पांचे भूमिपूजन आणि उद्‌घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होत आहे. 

महापालिकेने या कार्यक्रमांच्या जाहिराती वर्तमानपत्रांत दिल्या आहेत. या जाहिरातींमधून महापालिकेचे गटनेते, वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे गटनेते नाराज झाले आहेत. जाहिरातीतून नावे वगळून मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातून डावलणे हा अवमान असल्याची नाराजी गटनेत्यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने जाहिराती तयार करताना संबंधित विभागाशी चर्चा केली नसल्याचे दिसते, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com