mumbai congress president | Sarkarnama

उत्तर प्रदेश निवडणुकीनंतर ठरणार मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

ंमुंबई, ता. 25 ः मुंबई महानगरपालिकेतील दारुण पराभवाची जबाबदारी स्विकारत मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उपाध्यक्ष राहुल गांधी सध्या उत्तर प्रदेश निवडणुकीत व्यस्त असल्याने या राजीनाम्यावर अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नव्या मुंबई अध्यक्षाची निवड केली जाणार नाही. हे पद मिळविण्यासाठी आमदार भाई जगताप आणि बाबा सिद्दिकी यांच्यात अंतर्गत चुरस आहे. 

मुंबई कॉंग्रेस ही अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीशी थेट जोडली गेली आहे. त्यामुळे निवडणुकीतील पराभवानंतर निरुपम यांनी आपला राजीनामा थेट कॉंग्रेस हायकमांडकडे पाठविला आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या पक्षातील सर्व महत्वाचे निर्णय उपाध्यक्ष राहुल गांधींकडून घेतले जात आहेत. देशातील सगळ्यात मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी व्यस्त असल्याने फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात हा राजीनामा मंजूर होण्याची शक्‍यता आहे. 

निरुपम यांचा राजीनामा मंजूर झाल्यावर कॉंग्रेसचा नवा मुंबई अध्यक्ष कोण असेल, याबाबत सध्या कॉंग्रेसमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. यशस्वी कामगार नेता आणि आमदार भाई जगताप सुरुवातीपासूनच या पदासाठी इच्छुक आहेत. त्यांनी आपली ही इच्छा "प्रकट' केली नसली तरिही मुंबईतील बड्या कंपन्या आणि रुग्णालयांमधील युनियन भाईंच्या ताब्यात असल्याने त्यांची मोठी ताकद आहे. या ताकदीचा फायदा मुंबई कॉंग्रेसला होऊ शकतो. संघटना बांधणीसोबतच पक्षांची आर्थिक बाजू "बळकट' करण्यासाठीही भाईंचा फायदा होऊ शकतो. मात्र, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांनाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद हवे आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा फटका बसल्यानंतर पुन्हा सक्रीय राजकारणात "एन्ट्री' करण्याची संधी म्हणून सिद्दिकी या अध्यक्षपदाकडे "डोळे' लावून बसले आहेत. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी सिद्दिकी यांना अध्यक्षपदाचा "शब्द' दिल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे या पदासाठी आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच दिसून येणार आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख