Mumbai BMC elections Mumbai Mayor BJP Devendra Fadnavis | Sarkarnama

उपलोकायुक्त म्हणून कुणाची वर्णी लागणार? 

गोविंद तुपे
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई : मुंबईसाठी एक उपलोकायुक्त नियुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर करताच अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी यापदासाठी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपच्या अजेंड्यानुसार महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी कोणत्या अधिकाऱ्याची वर्णी लागतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

सर्व सरकारी यंत्रणामधील कारभारात होत असलेल्या गैरव्यवहाराच्या विरोधात लोकायुक्तांकडे कुठलाही सामान्य व्यक्ती दाद मागू शकतो. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिश किंवा राज्याचे मुख्य सचिव पद भूषविलेल्या व्यक्तीची लोकायुक्त या पदावर वर्णी लावण्याची आत्ता पर्यंतची परंपरा आहे. तर अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची उपलोकायुक्त पदी वर्णी लावली जाते.

पण सध्या असलेले उपलोकायुक्त शैलेशकुमार शर्मा हे याला अपवाद आहेत कारण निवृत्तीपुर्वी ते प्रधान सचिव होते. मात्र उपलोकायक्तांची नियुक्ती करण्यासाठी लोकायुक्तांची सहमती घ्यावी लागते. 

महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी राज्यसरकारकडून तीन सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. रामनाथ झा, गौतम चटर्जी, शरद काळे, हे तीन वरिष्ठ सनदी अधिकारी या समितीचे सदस्य आहेत. आणि पुढील तीन महिन्यात आपला अहवाल ही समिती राज्य सरकारकडे सादर करणार आहे. 

याच धर्तीवर मुंबईसाठी नेमण्यात येणाऱ्या उपलोकायुक्त पदाची धुरा मुख्यमंत्री कोणाच्या खांद्यावर देतील याबाबत अधिकारी वर्गात उत्सुकता लागली आहे. कारण पारदर्शकतेचा मुद्दा समोर करून सेनेला बेजार करण्याच्या भाजपच्या या धोरणात कोणता अधिकारी योग्य भूमिका पार पाडेल याची चाचपणी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख