मुंबई भाजपचा पहिला बाक रिकामा,मंत्रीपदाचे दावेदारच गारद !

या तिघांचे तिकट कापल्याने मुंबईतील मंत्रीपदाचे दावेदारच कमी झाले आहेत. मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक फळीच या निवडणुकीच्या निमित्ताने गारद झाल्याचे चित्र आहे .
Tawde-mehata-purohit
Tawde-mehata-purohit

मुंबई : प्रकाश महेता,विनोद तावडे आणि राज पुरोहित या मुंबईतील जेष्ट आमदारांचे तिकीट कापल्याने आता मुंबई भाजपचा पहिला बाक रिकामी झाला आहे.  भाजप अंतर्गत स्वच्छता मोहिमेत मुंबईतील दिग्गज नेत्यांच्या विकेट्स निघाल्याने बड्या बड्या नेत्यांची बोलती बंद झाली आहे . 

विनोद तावडे यांनी तर अध्यक्षपदापासून अनेक महत्वाच्या जबादारी पक्षात आणि सरकारमध्ये सांभाळल्या आहेत . प्रकाश  महेता आणि पुरोहित हे दोघे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आहेत. आता, माजी अध्यक्ष म्हणून फक्त आशिष शेलार मैदानात आहेत. या तिघांचे तिकट कापल्याने मुंबईतील मंत्रीपदाचे दावेदारच कमी झाले आहेत. मुंबई भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची एक फळीच या निवडणुकीच्या निमित्ताने गारद झाल्याचे चित्र आहे . 

राज  पुरोहित हे मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष होते. राज पुरोहित हे 1995 च्या सरकार मध्ये राज्यमंत्री होते. विनोद तावडे यांनी राज्याच्या समितीतही महत्वाची जबाबदारी सांभाळली आहे. तावडे यांच्याकडे 2014 मध्ये महत्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली होती . नंतर त्यांची जबाबदारी कमी करण्यात आली . तर प्रकाश महेता यांना दिल्लीतून शिफारस आणून आग्रहपूर्वक  गृहनिर्माण मंत्रीपद मिळविले  होते. पण,एसआरए घोटाळ्याचा कारणाने त्यांना मंत्रीपदावरुन हटविण्यात आले.

तावडे यांच्या जागी सुनिल राणे निवडणून लढवत आहेत.त्यांनी 2014 मध्ये वरळीतून निवडणुक लढवली होती.त्यांच्या शैक्षणिक संस्था असून अनेक व्यवसायही आहेत.

तर, महेता यांच्या जागी नगरसेवक पराग शहा हे पहिल्यांदा विधानसभेची निवडणुक लढवित  आहेत. पराग शहा यांना महेता यांनीच राजकरणात आणले होते. 2017 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक पदाची निवडणुक लढले होते.

कुलाब्याचे आमदार राज पुरोहित यांच्या जागी भाजपने ऍड.राहूल नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे. नार्वेकर यांनी गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विधान परीषद सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना तत्काळ पक्षाने एबी अर्ज दिला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते रामराजे निबांळकर हे नार्वेकर यांचे सासरे आहेत . नार्वेकर यांचे बंधू ऍड.मकरंद आणि वहिनी हर्षिता  भाजपच्या नगरसेविका आहेत. राहूल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरु झाला.ते शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com