भीम आर्मीची नामांतर स्टंटबाजी; दादर स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न - Mumbai-Bhim-Army-Dadar-Agitation | Politics Marathi News - Sarkarnama

भीम आर्मीची नामांतर स्टंटबाजी; दादर स्थानकाचे नाव बदलण्याचा प्रयत्न

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 6 डिसेंबर 2017

गेल्या काही महिन्यांत राज्यात नावारूपाला आलेल्या भीम आर्मीने आज दादर स्थानकाचे नाव बदलण्याची स्टंटबाजी केली.

मुंबई : गेल्या काही महिन्यांत राज्यात नावारूपाला आलेल्या भीम आर्मीने आज दादर स्थानकाचे नाव बदलण्याची स्टंटबाजी केली.

दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करत या स्थानकाला `डॉ. बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस म्हणा' असे संदेश लिहिलेले फलक दादर सेन्ट्रल व वेस्टर्न रेल्वेवर लावले.

भीम आर्मीच्या या स्टंटबाजीमुळे दादर सेंट्रल आणि वेस्टर्नवर येणाऱ्या प्रवाशांचे लक्ष या लावण्यात आलेल्या नवीन नावाकडे जात होते. 

भीम आर्मीचे कार्यकर्ते आणि चैत्यभूमीला आलेले भीमसैनिकही दादर स्थानकात लावण्यात आलेल्या या नवीन फलकासोबत सेल्फी काढून समाधान मानत असल्याचे चित्र आज दादर स्थानकात निर्माण झाले होते.

नामांतराचे हे स्टीकर दादर स्थानकात ज्या-ज्या ठिकाणी फलाटावर  स्थानकाची माहिती देणारे फलक होते, त्या ठिकाणी आणि जिथे जागा मिळेल त्या-त्या ठिकाणी लावण्यात आली होती.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख