मुंबई बाजार समितीची एवढी महत्त्वाची की फक्त दोघांनीच मतदान केले नाही...

...
navi mumbai bajar samiti.
navi mumbai bajar samiti.

यवतमाळ : सहकार क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या मुंबई बाजार समिती निवडणुकीसाठी शनिवारी (ता. 29) 99 टक्के मतदान झाले. अमरावती विभागातील 704 मतदारांपैकी 702 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

महाविकास आघाडीची सहकारातील पहिलीच निवडणूक असून दिग्गजांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.
देशातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. यामुळे दिग्गजांचे लक्ष याकडे केंद्रीत झाले होते.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांना राज्य सरकारने सहा महिने मुदतवाढ दिली आहे. असे असले तरी मुंबई बाजार समितीची निवडणूक जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार झाली. राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुबंई बाजार समिती निवडणुकीतही पहिल्यांदाच हा प्रयोग केला गेला. अमरावती महसूल विभाग मतदारसंघातून यावेळी तब्बल सात अर्ज कायम राहिले आहे. परिणामी या लढतीकडे सहकारातील "हायव्होल्टेज'लढत म्हणून पाहिल्या जात आहे.

अमरावती विभागातून दोन संचालक निवडून द्यायचे आहे. यासाठी शनिवार (ता.29) यवतमाळ, अमरावती, वाशीम, अकोला तसेच बुलडाणा या पाच ठिकाणी मतदान झाले. सर्वाधिक 220 मतदार यवतमाळ जिल्ह्याचे आहे. यानंतर अमरावती, बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्याचा क्रमांक आहे. अमरावती महसूल विभागात सात उमेदवार रिंगणारत आहे. यात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव रिंगणात आहे. अमरावती विभागातील दिग्गजासह राज्यातील सर्व विभागातील उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे.

दोन मार्चला मतमोजणी होणार आहे.
मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी जिल्ह्यातून सात उमेदवार कायम आहे. निवडणुकीची मतमोजणी दोन मार्चला मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्यालय वाशी येथे होणार आहे.

जिल्हा-एकूण मतदार-झालेले मतदान
यवतमाळ-220-219
अमरावती-175-175
बुलडाणा-133-133
अकोला-102-100
वाशीम-75-75

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com