मुंबईतील पायाभूत प्रकल्पांवर मुख्यमंत्री ठाकरे यांची बारीक नजर ! , 80 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा

मुंबईत मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. मेट्रोसह वर्सोवा बांद्रा सागरी सेतू, ठाणे खडीपूल क्रमांक-3, भिवंडी कल्याण शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण या प्रमुख प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. याचबरोबर नागपूर-ते मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा येथे वळण मार्ग-बोगदयासह या प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला.
मुंबईतील पायाभूत प्रकल्पांवर मुख्यमंत्री ठाकरे यांची बारीक नजर ! , 80 हजार कोटींच्या प्रकल्पांचा आढावा

मुंबई : मुंबईतील पायाभूत प्रकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बारीक नजर आहे. कोणत्याही परिस्थितीत मुंबई आणि परिसरातील पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण करायचेच. या प्रकल्पांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आढावा बैठकीत आपल्या भावना व्यक्‍त केल्या आहेत. 

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने मंत्रालयात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थित प्रकल्पांचे सादरीकरण आणि आढावा घेण्यात आला. यामध्ये 80 हजार कोटींच्या प्रकल्पाविषयी माहिती देण्यात आली. या प्रकल्पांच्या कामाची विदयमान परिस्थिीतीविषयी सांगण्यात आले. आता पर्यंत झालेला खर्च, प्रकल्प पुर्ण होण्यासाठी लागणारा कालावधी, त्यावरील खर्च याबाबत सविस्तर माहिती आधिका-यांनी ठाकरे यांना दिली. यावेळी प्रकल्पासह राज्यातील रस्त्यांची स्थिती, त्यावर वार्षिक दुरस्तीसाठी येणारा खर्च याबाबत देखील चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

मुंबईत मेट्रोसह अनेक पायाभूत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. मेट्रोसह वर्सोवा बांद्रा सागरी सेतू, ठाणे खडीपूल क्रमांक-3, भिवंडी कल्याण शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण या प्रमुख प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. याचबरोबर नागपूर-ते मुंबई महाराष्ट्र समृद्धी महामार्ग, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा येथे वळण मार्ग-बोगदयासह या प्रकल्पांच्या सध्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच नवीन घोषित केलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या 1621 कि.मी. लांबीच्या रस्त्यांचे दुपदरी व चौपदरी क्रॉक्रीटीकरणाच्या कामाच्या निधीबाबत चर्चा करण्यात आली. तसेच राज्यातील सुमारे एक लाख किमी लांबींच्या रस्त्यांना दुरस्तीसाठी सुमारे दहा हजार कोटी इतका निधी लागतो. यावर काही मार्ग काढता येईल का?अशी विचारणा देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केल्याचे सांगण्यात आले. 

"पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने करा ' 
मुंबईतील पायाभूत प्रकल्पांची कामे वेगाने झाली पाहिजेत. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. अधिका-यांनी कोणताही आडपडदा न ठेवता मला स्पष्ट भाषेत सांगावे. मात्र कामे वेगाने झाली पाहिजेत, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी अधिका-यांना सांगितल्याचे समजते. 

प्रकल्पनिहाय खर्च- आकडे कोटीत 
- समृद्धी महामार्ग- 55 हजार 335 
- वर्सोवा बांद्रा सागरी सेतू- 11 हजार 333 
- ठाणे खाडी पूल क्रमांक 3- 776 कोटी 
- भिवंडी कल्याण शीळफाटा रस्त्याचे सहा पदरीकरण- 389 
- मुंबई पुणे महामार्गावरील खंडळा येथील वळण मार्ग बोगदा- 6 हजार 695 
- राष्ट्रीय महामार्गाच्या 1621 किमी लांबींच्या रस्त्याचे दुपदरीकरण, चौपदरी क्रॉंक्रीटीकरण- 5 हजार 385 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com