हजारो कोटींच्या ठेवी असलेली मुंबई तुंबतेच कशी ? नितीन गडकरी यांचा मुंबई महापालिकेला सवाल

हजारो कोटींच्या ठेवी असलेली मुंबई तुंबतेच कशी ? नितीन गडकरी यांचा मुंबई महापालिकेला सवाल

मुंबई : मुंबई महापालिका ही जगातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ओळखली जाते. हजारो कोटींची ठेव असलेल्या या महापालिकेच्या हद्दीत पावसाचे पाणी तुंबतेच कसे, असा प्रश्‍न केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केला. मुंबईला बंद पाडणारे असे प्रश्‍न ताबडतोब सोडवले पाहिजेत, असे गडकरी म्हणाले. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने गोराई येथे खारफुटी उद्यानाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

या वेळी शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेनेच्या आमदारांनी मात्र गडकरींची ही टिप्पणी शांतपणे ऐकून घेतली. विदर्भात कचऱ्यावर प्रक्रिया करून मिळणाऱ्या इंधनाचा वापर वाहन चालवण्यासाठी केला जातो. त्यामुळे लवकरच विदर्भातील सहा जिल्हे डिझेल मुक्त होतील, असा दावा करत मुंबई पालिकेने बॅंकेतील ठेवी वापरून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प उभारा, हे पाणी गुजरात आणि नाशिकच्या शेतकऱ्यांना द्या, असा सल्ला आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. 

गडकरी पुढे म्हणाले, "दिल्लीतील प्रदूषण 29 टक्‍क्‍यांनी कमी झाले आहे. त्यासाठी दिल्लीत वेगवेगळ्या योजना राबवल्या गेल्या. गंगेच्या उपनद्यांवरील प्रदूषण कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. नागपुरात सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते वीज प्रकल्पांना विकले जाते, त्यातून उत्पन्नही मिळते. तसेच, कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर मिळणाऱ्या इंधनातून 450 बसेसमध्ये ते वापरले जात आहे. मुंबईचा समुद्र हा सुंदरच असायला हवा, कचऱ्यावर प्रक्रिया करून मिथेन, कार्बनडाय ऑक्‍साईडसारखे वायू मिळू शकतील. त्याचा वापर इंधन म्हणून करता येईल. मुंबईनेही याचा विचार करायला हवा. मुंबईत नागरी प्रश्‍नांवर भर द्यायला हवा, असे गडकरी यांनी नमूद केले 

इथेनॉलपासून बायोप्लास्टिक 
इथेनॉलपासून बायोप्लास्टिक बनवता येते, असा दावा गडकरी यांनी केला. प्लास्टिकमुळे होणाऱ्या जलप्रदुषणावर काम करण्याची गरज आहे. राज्यात प्लास्टिकबंदी आहे. इथेनॉलपासून बनवलेले प्लास्टिक हे विघटनशील असल्याने त्याचा वापर करता येईल. 

कोरा केंद्रातील लघुउद्योगांसाठी 100 कोटी 
बोरिवली येथील खादीग्राम उद्योग विभागाच्या विकासालाही भर देण्यात येणार आहे. बोरिवली येथील कोरा केंद्राच्या 140 एकर जागेत रुग्णालय उभारण्यासाठी तसेच लघु उद्योगांना चालना देण्यासाठी 100 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com