सुशांतसिंह प्रकरण : झोन नऊचे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे रजेवर - dcp abhishek trimukhe on leave due to medical reasons | Politics Marathi News - Sarkarnama

सुशांतसिंह प्रकरण : झोन नऊचे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे रजेवर

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

सुशांतसिंह प्रकरणात त्रिमुखे यांची भूमिका महत्त्वाची

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवर अनेकांनी संशय व्यक्त केले. सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास वांद्रे पोलिस हे करत असताना यात परिमंडळ ९ चे पोलिस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी महत्वाची भूमिका होती. सध्याच्या कोरोना संक्रमणात काळात अनेक जण त्यांच्या संपर्कात होते. त्यामुळे काही दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी शुक्रवारी रुग्णनिवेदन देत सुट्टीवर गेल्याचे कळते.

ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिली. मात्र त्यास अधिकृतरित्या दुजोरा मिळू शकला नाही. त्यांचे कुटुंबीयदेखील पाॅझिटिव्ह असल्याचे या वाहिन्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी वांद्रे पोलिस ठाण्याचे निरीक्षक बेल्हेकर हे सुद्धा कोरोना पाॅझिटिव्ह झाले होेते. 

सुशांतसिंहच्या मृत्यू प्रकरणात त्रिमुखे हे आघाडीवर राहून तपास करत होते. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात साठहून अधिक जणांचे जबाब नोंदविले होते. त्यात रिया चक्रवर्तीसह महेश भट, आदित्य चोप्रा, करण जोहर आदी सेलिब्रिटिंचा समावेश होता. मुंबई पोलिसांनी घटना घडून गेल्यानंतरही कोणताच गुन्हा दाखल केला नव्हता. तसेच सुशांतसिंहचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे त्यांनी तपासाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मांडले. तसेच रिया आणि अभिषेक त्रिमुखे यांच्यातील टेलिफोन काॅलचेह प्रकरण गाजले. त्यावरून त्यांना संशयाच्या भोवऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न झाला. 

यावर त्रिमुखे यांनी स्वतःहून काही स्पष्टीकरण दिले नसले तरी रियाने मात्र आपल्याला धमक्या येत असल्याने मी त्याबाबत सांगण्यासाठी त्रिमुखेंना फोन केला होता, असा दावा एका मुलाखतीत केला होता. सीबीआय देखील त्रिमुखे यांच्याशी सुरवातीला समन्वय ठेवून तपास करत होती.  सुशांतसिंह याचा मोबाईल, डायरी व इतर पुरावे त्रिमुखे यांच्या उपस्थितीत सीबीआयकडे देण्यात आले होते.

रिया चक्रवर्ती हिची सीबीआयने काल कसून चौकशी केली. त्यानंतर ती सांताक्रुझ पोलिस ठाण्यात गेली. या प्रकरणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, सीबीआय चौकशी झाल्यानंतर रियाने काल तातडीने सांताक्रूज पोलीस ठाणे गाठले. याचा खुलासा मुंबई पोलिसांनी करावा. आरोपी असतानाही तिला पोलीस संरक्षण का देत आहेत? सीबीआयने कोणते प्रश्न विचारले याची माहिती तिने मुंबई पोलिसांकरवी तिच्या राजकीय बॉसला दिली का? ज्या तातडीने रियाला सोशल मीडिया पोस्टच्या आधारावर मुंबई पोलिसांनी संरक्षण दिले त्या तातडीने सुशांतच्या नातेवाईकांनी पाठविलेल्या व्हॉट्सअॅप संदेशाला तोच न्याय का लावला नाही? या सर्व बाबींची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख