Uddhav Thackeray News: उद्धव ठाकरे पुन्हा पक्षप्रमुख ? ; कायदेशीर,तांत्रिक त्रुटी राहू नयेत म्हणून..

Thackeray Group Party Chief: कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Shivsena - Uddhav Balasaheb ThackeraySarkarnama

Thackeray Group : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे. त्यामुळे खरी शिवसेना ही शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे, तर उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष नाही तर गट म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. (uddhav thackeray party chief again decision will be taken in executive meeting of thackeray group)

उद्धव ठाकरे नेतृत्व करीत असलेल्या ठाकरे गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या 18 जूनला होणार आहे. यावेळी ठाकरे गटाचे सर्व नेते, राज्यातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे समजते. तर याच बैठकीत उद्धव ठाकरे यांची पुन्हा पक्षाच्या पक्षप्रमुखपदी निवड केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Pune News : स्टॉलला लाथ मारणाऱ्या जगतापांवर कारवाई कधी ?; राजकीय पक्ष,पथारी संघटना आक्रमक

सोळा आमदाराबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी ठाकरे गटाची रणनीती असल्याचे राजकीय जाणकार सांगतात. कायदे तज्ज्ञांशी सल्लामसलत करुन त्याबाबतचे तपशील ठरविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेना फुटीनंतर आणि ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपल्यानंतर प्रथमच ही बैठक होणार आहे. शिवसेनेचा वर्धापनदिन १९ जूनला होणार असून ठाकरे यांची षण्मुखानंद सभागृहात सभाही होणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून शिवसेना पक्षाचा प्रमुख कोण हा प्रश्न विचारला जात आहे.

Shivsena - Uddhav Balasaheb Thackeray
Insurance Scam Case : सत्यपाल मलिकांच्या निकटवर्तीयांवर CBI चा छापा; मीडिया सल्लागार, स्वीय सहायकांच्या..

काल (बुधवारी) शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत.

ठाकरे यांनी राष्ट्रीय व राज्य कार्यकारिणी सदस्य आणि पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची लोकशाही पध्दतीने निवड झाली पाहिजे, असे आयोगाने आपल्या आदेशात म्हटले होते.

त्यामुळे विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापुढे कोणत्याही कायदेशीर व तांत्रिक त्रुटी राहू नयेत, यासाठी कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवश्यक ठराव आणि कार्यकारिणी सदस्य व पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com