ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत; राऊतांचा कंगनाला टोला - Shivsena MP Sanjay Raut Answers Kangana Ranaut Tweet | Politics Marathi News - Sarkarnama

ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत; राऊतांचा कंगनाला टोला

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

संजय राऊत आपल्याला उघडपणे धमकी देऊन मुंबईत येऊ नकोस, असे सांगत असल्याचा आरोप कंपनाने ट्वीटरवर केला आहे. त्याला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिले.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातली मंदीर उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले

मुंबई : अभिनेत्री कंगना राणावतने ट्वीटरवर खेळण्यापेक्षा बाॅलीवूडमधील ड्रग माफियांबद्दल ट्वीटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे त्याबाबतचे पुरावे द्यावेत, असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केले. कंगना राणावत सारख्यांना किती महत्व द्यायचं हे मीडियाने ठरवलं पाहिजे, असाही टोला त्यांनी लगावला. 

संजय राऊत आपल्याला उघडपणे धमकी देऊन मुंबईत येऊ नकोस, असे सांगत असल्याचा आरोप कंपनाने ट्वीटरवर केला आहे. त्याबाबत राऊत बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातली मंदीर उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "जनतेचं हित लक्षात घेऊन सरकारचा मंदिरांबाबतचा निर्णय आहे. सरकारला मंदिरं बंद करण्याची हौस नाही. फक्त राजकारणासाठी विरोध करू नये, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. काल कोरोनाच्या आकड्यात महाराष्ट्रासह देशात वाढतो आहे. पंढरपूरला आंबेडकरांच्या आंदोलनात नियमांचा फज्जा उडाला. या सर्वांनी थोडा संयम बाळगायला हवा, महाराष्ट्राचं अहित होणार नाही याचं भान सर्वांनी ठेवलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारप्रमाणे कोरोनाला 'ऍक्ट ऑफ गॉड' मानायला तयार नाही. त्यामुळे या कोरोनाशी आपल्यालाच लढायचं आहे,"

काल राज्य शासनाने आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्या आधी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "सरकार बदललं की बदल्या करायच्या नाही असं संविधानात लिहलय का? यापूर्वीच्या किंवा केंद्राच्या सरकारमध्ये बडक्या झाल्या नव्हत्या का?,''

मुख्यमंत्री ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत, अशी टीका विरोधक करत आहेत. त्याबाबत बोलताना राऊत म्हणाले, "संपूर्ण मंत्रिमंडळ फिरते आहे. मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या कामाची सध्या सारखीच आहे. ते एका जागेवरून यंत्रणेवर लक्ष ठेऊन आहेत.मुख्यमंत्री बाहेर पडले की यंत्रणेवर ताण येतो, अधिकाऱ्यांची गर्दी होते. हे टाळण्यासाठी काही प्रोटोकॉल आहेत ते पाळले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी कुठे बसून काम करावे हा त्यांचा अधिकार आहे. एका जागेवरती बसून कामाची व्याप्ती वाढवून काम करण्याची डिजिटल इंडियाची संकल्पना नरेंद्र मोदींचीच आहे,"

संसदेच्या अधिवेशनात प्रश्नोत्तराचा तास रद्द करण्यात आला आहे. त्यावर काही विरोधकांनी टीका केली आहे. त्यावर बोलताना राऊत म्हणाले, " संसदेत प्रश्नोत्तराचा तास होणार नाही, कारण कोरोना संकट आहे. अधिवेशन होणं महत्वाचे आहे. काल पुण्यात पत्रकार पांडुरंग रायकर याचे कोरोनाने निधन झाले. त्यावरही राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, "पुण्यात रुग्णवाहिका उपलब्ध होऊ नये, हे दुर्दैव आहे. रायकर यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे." 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख