MIM कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न ; मुंब्र्यातील कार्यालयाची तोडफोड

MIM : रॉड, कोयते घेऊन १० ते १२ अज्ञात व्यक्तींनी एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची तक्रार सय्यद पठाण यांनी पोलिसांकडे केली आहे.
MIM
MIM sarkarnama

ठाणे : एमआयएम (MIM) पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यावर अज्ञातांनी हल्ला केल्यामुळे मुंब्रा (mumbai) येथे काल (गुरुवारी) रात्री तणाव निर्माण झाला होता, आता या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. याप्रकरणी पोलिसांनी १० ते १२ अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

गुरुवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. १० ते १२ हल्लेखोरांनी ठाण्यातील मुंब्रा येथे असलेल्या एमआयएम पक्षाच्या कार्यालयावर आणि कार्यकर्त्यावर हल्ला केला.या हल्ल्यात एमआयएमच्या कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. हल्लेखोरांनी एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. जखमीला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आली आहे.

MIM
Congress President Election : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी २२ वर्षांनंतर निवडणूक, अधिसूचना जारी

हा हल्ला माझा खून करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे नेते सैफ पठान यांनी केला आहे. "माझ्यावर खोटी केस लावत मला कारागृहात पाठविले आणि त्यानंतर मला मारून टाकणार असे काही जण परिसरात बोलत होते," असा आरोप मुंब्रा विधानसभा एमआयएम अध्यक्ष नेते सैफ पठान यांनी केला आहे.

रॉड, कोयते घेऊन १० ते १२ अज्ञात व्यक्तींनी एमआयएमच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची तक्रार सय्यद पठाण यांनी पोलिसांकडे केली आहे. बिलाल असं हल्ला झालेल्या तरूणाचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com