सौ चुहे खाके बिल्ली चली हज को; मंत्री हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर  - Hassan Mushriff Answers Chandrakant Patil's Allegations | Politics Marathi News - Sarkarnama

सौ चुहे खाके बिल्ली चली हज को; मंत्री हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 ऑगस्ट 2020

महाविकास आघाडीने ज्या बदल्या केल्या आहेत त्यांची सीआयडी चौकशी केली पाहिजे असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा समाचार हसन मुश्रीफ यांनी घेतला. बदल्यांच्या चौकशीची मागणी चंद्रकांत पाटील यांनी करणे म्हणजे, चुहे खाके बिल्ली चली हज को असेच आहे, असे ते म्हणाले

कोल्हापूर : महाविकास आघाडीच्या काळातील बदल्यांची चौकशी करण्याची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी म्हणजे 'सौ चुहे खाके बिल्ली चली हज को' असे म्हणण्यासारखे आहे, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. जिल्हा परिषदेच्या टॅब वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.

महाविकास आघाडीने ज्या बदल्या केल्या आहेत त्यांची सीआयडी चौकशी केली पाहिजे असे विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्याचा समाचार घेताना मुश्रीफ म्हणाले, ''बदल्यांच्या चौकशीची मागणी चंद्रकांत पाटील यांनी करणे म्हणजे, चुहे खाके बिल्ली चली हज को असेच आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी २०१४ पासूनच्या सर्व बदल्यांची सीआयडी चौकशी करू असे सांगितले आहे. ग्रामविकास विभागाने कोरोनावरील उपचारासाठी २३ रूपये दराने अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या खरेदी केल्यानंतर त्या मी दोन रूपये दराने खरेदी करून देण्याचे आश्‍वासन श्री. पाटील यांनी दिले होते, पण त्या गोळ्या अजून आलेल्या नाहीत.''

पार्थ पवार प्रकरणाबाबत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ''हा पवार साहेबांच्या कुटुंबातला प्रश्न आहे. पवार कुटुंबाची एकता याची उदाहरणे राज्यात दिली जातात. पवार साहेब कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी समर्थ आहेत,''

पंचांग बरोबर पण मुहूर्त चुकीचा
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुश्रीफ म्हणाले, ''सत्ता गेल्यामुळे ते सैरभैर झाले आहेत. त्यामुळे ते अभ्यास न करता आंदोलने करत आहेत. फडणवीसांचे पंचांग बरोबर असले तरी मुहूर्त चुकीचे आहेत. म्हणूनच कोरिनाच्या संकट काळात ते आंदोलने करत आहेत. महाविकास आघाडी वर ते जेवढ्या टीका करतील तेवढी ही आघाडी अधिक घट्ट होईल,''
Edited By- Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख