मुली पळवा सागणाऱ्यांनी देवाबद्दल बोलू नये : दादा भुसेंकडून राम कदमांचा समाचार - Dada Bhuse Answers Ram Kadam's Allegations on Shivsena | Politics Marathi News - Sarkarnama

मुली पळवा सागणाऱ्यांनी देवाबद्दल बोलू नये : दादा भुसेंकडून राम कदमांचा समाचार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

काल भाजपच्या वतीने राज्यभरात मंदीरे सुरु करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यानी  बुलडाणा येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी भाजपच्या नेत्यांना समाचार घेतला

बुलडाणा : "जी व्यक्ती मुलींना पळवून आणा असे जाहीरपणे सांगते, अशा व्यक्तीला देवाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी भाजप आमदार राम कदम यांचा खरपूस समाचार घेतला. शिवसेना हिंदुत्व विसरली, असे वक्तव्य राम कदम यांनी राज्यातील मंदीरे सुरु करण्याच्या मुद्द्यावरुन केले होते. त्याला भुसे यांनी उत्तर दिले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्या दबावाला बळी पडून संपवले आहे. म्हणूनच त्यांच्या या आघाडी सरकारच्या राज्यात मदिरा सुरू आणि मंदिर मात्र बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागल्याची टीका भाजप आमदार किसन कथोरे यांनीही केली होती. काल भाजपच्या वतीने राज्यभरात मंदीरे सुरु करण्याच्या मागणीसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. राज्याचे कृषीमंत्री दादा भूसे यानी  बुलडाणा येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुसे यांनी भाजपच्या नेत्यांना समाचार घेतला. 

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरणात राज्यातील एक मंत्री असल्याचे वक्तव्य भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केली होती. त्यावरही भुसे यांनी टीका केली. नारायण राणेंचा इतिहास भूगोल सर्वांना माहीत आहे, सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच्या चेहऱ्यावर थुंकी पडते, हे राणे यांनी लक्षात घ्यावे. निष्कलंक, अतिशय शुद्ध चारित्र असलेल्या लोकांवर खोटे आरोप करीत असाल तर  नीति, योग्य वेळेला धड़ा शिकवित असते, असे भुसे म्हणाले. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख