सीताराम भांगरे बनले रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील रामदूत

आता मंदिराचे स्वप्न साकार होत असल्यानेअकोले येथीलसिताराम भांगरे यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे.हा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस ठरला आहे.
bhangare .png
bhangare .png

अकोले : प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत भव्य मंदिर उभारणीची पायाभरणी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. हा दिवस पाहण्यासाठी अनेक कारसेवक डोळ्यात तेल घालून होते. कारसेवकांनी १३ वर्ष विविध आंदोलन करून ६ डिसेंबर १९९२ ला रामलल्लाची स्थापना केली होती. आता मंदिराचे स्वप्न साकार होत असल्याने अकोले येथील सिताराम भांगरे यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यांच्यासाठी हा दिवस म्हणजे सोन्याचा दिवस ठरला आहे. 

राम जन्मभूमी आंदोलन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी सुरू केले होते. सिताराम भांगरे यांनी मुंबई सोडून गावी येऊन संघाच्या कामाला सुरुवात केली होती. त्याच वेळी तालुक्यात अयोध्या आंदोलनासाठी विश्व हिंदू परिषदेने वारकरी संप्रदायाच्या महाराजांची बैठक बोलावली. यानंतर प्रत्येक गावात राम मंदिर झाले पाहिजे, या उद्देशाने तालुक्यात वातावरण तापायला सुरवात झाली. या वेळी सिताराम भांगरे यांनी शंकराचार्य, आचार्य विश्वनाथ, भास्करगिरी महाराज, रामराव ढोक महाराज यांच्या जनजागृती सभा घेतल्या.

शिलापूजन हा कार्यक्रम सिताराम भांगरे यांनी अकोले तालुक्यात भव्य प्रमाणात साजरा केला. रामनाथ महाराज जाधव, मनोहर महाराज भोर, यांच्या माध्यमातून गावोगावी शिलापूजन करण्यात आले. त्यात सव्वा रुपया निधी राममंदिरासाठी गोळा करण्यात आला. प्रा. एस. झेड. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली १४५ गावात शिलापूजन करण्यात आले. आलेल्या विटांची भव्य मिरवणूकीत काढण्यात आली. या दरम्यान भांगरे यांचा बेलापूरजवळ शिलापूजन करून येताना अपघात झाला. मोटारसायकल पूर्ण तुटली, मात्र दोघांना साधे फक्त खरचटले सुद्धा नाही. श्रीराम प्रभूंनीच रक्षा केल्याची भावना या वेळी सगळ्यानाच झाली. या शिलापूजनात डॉ. सी. पी. देशपांडे, रमेश नेवासकर, रघुनाथ उगले यांनी बहुमोल मदत केली.

विश्व हिंदू परिषदेने दिल्ली येथे विराट हिंदू संमेलन घेतले, त्यासाठी दिल्लीला सिताराम भांगरे यांनी उपस्थिती लावली होती. पहिल्यांदा अयोध्येत शिलापूजन कार्यक्रम ठरला, मात्र त्याला सिताराम भांगरे यांना जाता आले नाही. राम मंदिर होण्यासाठी अगस्ती ते नगर अशी रथयात्रा काढण्यात आली. अगस्ती आश्रम, संगमनेर, पारनेर नगर अशी ही रथयात्रा ६ दिवसांनी नगरला पोहचली. या रथयात्रेत पांडुरंग महाराज मुखेकर, मनोहर महाराज भोर, वाणी महाराज, धोंडिबा रोहकले यांनी गावोगावी जागृती केली. या रथयात्रेवर धोंडिबा वाकचौरे (कळस) हे भगवे वस्त्र परिधान करून सोबत होते. वडगाव पान फाट्यावर गोपीनाथ मुंडे यांनी या यात्रेला भेट दिली, तर या यात्रेवर पारनेरजवळ सशस्त्र हल्ला झाला. सिताराम भांगरे या यात्रेत संरक्षणासाठी असलेले पोलीसांमुळे बचावले. 

खऱ्या अर्थाने ६ डिसेंबरच्या कारसेवेच्या वेळी अकोले, संगमनेर, नेवासे या तीन तालुक्यांची १२० लोंकांची वाहिनी घेऊन सिताराम भांगरे झेलम एक्सप्रेस ने २ डिसेंबर ला रवाना झाले. अयोध्येत साकेत डेअरीजवळ टेंथनगर हा जिल्ह्यासाठी होता. अकोले तालुक्यातील ४० लोकांचा जथा त्यांचे बरोबर होता. ४, ५ व  ६ डिसेंबरला अनेक साधू संत, महंत, नेते यांनी भाषणे करून जनतेला रामजन्मभूमी मुक्त करण्याचा संदेश दिला.

लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, अशोक सिंघल, प्रमोद महाजन, विनय कटियार, उमा भारती, यांच्या भाषणाने करसेवक पेटून उठले. सिताराम भांगरे, तात्याबा धुमाळ सहपत्नीक, दौलत अण्णा देशमुख, शैय्या काका भाटे, अशोक रसाळ सहकुटुंब, अनिल सोमणी, धनंजय संत, गोपाळराव गाभाले, धोंडिबा वाकचौरे, पिंट्या म्हसे, बाळासाहेब मुळे, गोरख वाकचौरे, ज्ञानेश्वर भांगरे, सुभाष देशमुख, दिनकर घारे, भास्कर फापाळे, निवृत्ती पोखरकर, रत्नप्रभा रसाळ आपले दोन मुलींबरोबर ४० जनांचा जथा होता. शिवाजीराव धुमाळ हेही या करसेवेत आले होते. रामल्लाची स्थापना केल्यानंतर हे सर्व आनंदी झाले.

"सियावर रामचंद्र कि जय" "मंदिर भव्य बनाऐंगे " च्या जयजयकार ने केलेल्या कार्याची सिद्धी झाली. ह्यात कारसेवकांनची चुकामूक झाली. तात्याबा धुमाळ अन धोंडिबा वाकचौरे काही लवकर येईना. तात्याबा धुमाळ तेथील विटाच घेऊन आले. कसे बसे साकेत डेअरीपर्यंत पोहचले. जोपर्यंत सगळे एकत्र येत नव्हते, तो पर्यंत जीवात जीव नव्हता. अयोध्यासह सर्व देशात दंगली सुरू झाल्या. अयोध्येत सर्वत्र लाईट बंद होती. दुसऱ्या दिवशी सर्व रेल्वे स्टेशनवर आले. गर्दी भयंकर. रात्री वाराणशीपर्यंत ही मंडळी आली. तेथे मुक्काम केला. बाहेर दंगल सुरू होती. जीवात जीव नव्हता. तेथे अनिल सोमणी यांना कोणी तरी सांगितले, की बाहेर कारसेवकांना भोजन आहे, ते चालले तर सिताराम भांगरे व धनंजय संत त्यांना अडविले. नाहीतर भयंकर घटना घडली असती.

अकोले येथे आल्यावर सर्वांचा सत्कार झाला. मनोहरपूर गावातही सभा झाली. त्यात सर्वांनी आनंद व्यक्त केला. नंतर संघावर बंदी घालण्यात आली, अन सिताराम भांगरे यांना अटक झाली. दुसऱ्या दिवशी सोडून देण्यात आले. बंदीनंतर दिल्लीला हिंदू चेतना मेळावा होणार होता. सिताराम भांगरे जाण्यासाठी तयारीत असताना पोलिसांनी अटक करून सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली.

रामल्ला हम अवत है, मंदिर भव्य बनावत है, ही त्यावेळची घोषणा आज प्रत्यक्षात मंदिराचा प्रारंभ ह्याची देही याची डोळा साकार होताना दिसत असल्याने याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतं असू शकते, असे मत सिताराम भांगरे यांनी व्यक्त केलं आहे.

Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com