आजचा वाढदिवस - mukul vasanik birthday | Politics Marathi News - Sarkarnama

आजचा वाढदिवस

sarkarnama
बुधवार, 27 सप्टेंबर 2017

मुकुल वासनिक, 
माजी खासदार, रामटेक, बुलडाणा. 

मुकुल वासनिक, 
माजी खासदार, रामटेक, बुलडाणा. 

अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी असलेले मुकुल वासनिक यांचा राजकीय प्रवास हा कॉंग्रेसच्या एनएसयुआयमधून सुरू झाला. तीन वेळा खासदारकी भुषविणारे वडील बाळकृष्णराव वासनिक यांचा राजकीय वारसा मुकुल वासनिक समर्थपणे पुढे नेत आहेत. वडिलांची राजकीय मुसद्देगिरी, अभ्यासू नेतृत्व आणि पक्षनिष्ठा हे गुण आत्मसात केल्यानेच ते गांधी घराण्याचे निकटवर्तीय राहिले. 1984-86 पर्यंत ते एनएसयुआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, 1988-90 पर्यंत युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यांनी भूषविले. तीन वेळा खासदार भुषविणारे मुकुल वासनिक यांना देशातील सर्वांत तरुण खासदार होण्याचा मान मिळाला. बुलडाणा,नागपूर आणि रामटेक या तीनही मतदार संघात त्यांचा प्रभाव आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख