कसब्यातून आमदार कोण होणार ? मुक्ता टिळक की गणेश बिडकर ?

कसब्यातून आमदार कोण होणार ? मुक्ता टिळक की गणेश बिडकर ?

पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघ पुण्यातला राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाचा मतदारसंघ मानला जातो. विद्यमान खासदार गिरीश बापट यांनी सलग पाचवेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. बापट यांच्या जागी विधानसभेला कुणाला संधी मिळणार याची जोरदार चर्चा आता सुरू झाली आहे. अन्य अनेक नावांची चर्चा असली तरी नगरसेवक गणेश बिडकर की महापौर मुक्ता टिळक यांच्या नावावर प्रामुख्याने चर्चा सुरू आहे. 

हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. भाजपाचे राजकीय अस्तित्व अत्यंत क्षीण होते. त्याकाळातही या मतदारसंघातून बापट यांनी मतदारसंघात विजय मिळविला आहे. त्यामुळे उमेदवार ठरवाताना पक्षाला अनेक नावांचा विचार करावा लागणार आहे. महापौर टिळक व नगरसेवक बिडकर यांच्यासोबत नगरसेवक हेमंत रासने, धीरज घाटे यांच्या नावाची चर्चादेखील आहे. 

मात्र, सध्याच्या राजकीय स्थितीचा विचार करता सर्वाधिक संधी टिळक यांना मिळू शकते. टिळक या नावाला असलेली राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा, मुक्ता टिळक यांचे चांगली प्रतिमा, त्यांना महापौरपदाची मिळालेली संधी आणि इतरांच्या तुलनेत खासदार बापट यांच्याकडून त्यांच्या नावाला मिळू शकणारी पसंती यामुळे महापौर टिळक यांना कसब्यातून आमदार होण्याची सर्वाधिक शक्‍यता आहे. 

मुक्ता टिळक यांची राजकीय कारकीर्द भाजप सत्तेत आल्यापासून अधिक बहरली आहे. सर्वात सिनिअर महिला नगरसेविका असल्याने महापौरपद त्यांच्याकडे चालून आले. या पदाला सव्वा वर्षाऐवजी अडीच वर्षांची मुदत मिळाली. विधानसभा निवडणुकीमुळे तीन महिन्यांची मुदतवाढही मिळाली. त्यामुळे विधानसभा निवडणुका होईपर्यंत महापौरपद त्यांच्याकडेच राहणार आहे. विधानसभेच्या उमेदवारीतही त्यांचे नावे आघाडीवर असल्याने त्यांना आमदारकीची संधी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. या निवडणुकीत उमेदवारीचे सर्वाधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची पसंती मिळाली तर बापट यांच्याकडून टिळक यांच्यासाठी कोणतीच अडचणी येण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे आजमितीला महापौर टिळक यांचे पारडे जड आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com