नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेताच काँग्रेसला बसला पहिला मोठा धक्का

चरणजितसिंग चन्नी यांनी आज पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर काँग्रेसला पहिला मोठा धक्का बसला आहे.
Ajay Vir Jakhar
Ajay Vir JakharSarkarnama

नवी दिल्ली : चरणजितसिंग चन्नी (Charanjit Singh Channi) यांनी आज पंजाबच्या (Punjab) मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली. यानंतर काँग्रेसला पहिला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले सुनील जाखड (Sunil Jakhar) यांच्या पुतण्याने पंजाब राज्य शेतकरी आयोगाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामुळे पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला आहे.

माजी प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील जाखड यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर होते. परंतु, पक्ष नेतृत्वाने चन्नी यांची निवड केली. आज चन्नी यांनी शपथ घेतल्यानंतर काही वेळातच जाखड यांचे पुतणे अजय वीर जाखड (Ajay Vir Jakhad) यांनी पंजाब राज्य कृषी आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. परंतु, त्यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण दिलेले नाही.

माजी लोकसभा अध्यक्ष बलराम जाखड यांचे अजय हे नातू आहेत. ते पंजाबमधील अबोहार येथील आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्री असताना एप्रिल 2017 मध्ये अजय जाखड यांची आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. अजय यांचे वडील सज्जन कुमार जाखड हे माजी राज्यमंत्री होते. राज्यातील 2022 च्या विधानसभा निवडणुका नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असे ट्विट पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनी केले होते. यावर सुनील जाखड यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. रावत यांचे विधान दिशाभूल करणारे आणि गोंधळ परसरवणारे असल्याची टीका त्यांनी केली होती. पंजाबचे नवीन मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांच्या अधिकारावर गदा आणली जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

सुरवातीला मुख्यमंत्रिपदासाठी माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर असल्याचे मानले जात होते. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्षपद देण्यासाठी जाखड यांना त्यावर पाणी सोडावे लागले होते. ते सध्या आमदार नाहीत. त्यांनी तीनवेळा अबोहार मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असून, पंजाब विधानसभेत ते 2012-2017 या काळात विरोधी पक्षनेते होते. यानंतर 2017 मध्ये ते गुरदासपूरमधून लोकसभेवर निवडून गेले होते. मागील 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अभिनेते सनी देओल यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. पण जाखड यांच्या नावाला आमदारांनी विरोध केला होता.

Ajay Vir Jakhar
नवीन मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तासाभरातच धडाधड घेतले मोठे निर्णय

प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांना अमरिंदरसिंग यांचाच विरोध होता. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून सिध्दू यांना मुख्यमंत्रिपदासाठी पुढे केले गेले नाही. तसेच, प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नुकतीच निवड केल्यानं त्यांचे नाव शर्यतीत मागे पडले. तर अंबिका सोनी यांनीही मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर रंधवा यांच्या नावावर चर्चा झाली होती. अखेर चन्नी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com