Mukhtar Abbas Naqwi taunts Rahul Gandhi | Sarkarnama

भाजपचे मुख्तार अब्बास म्हणतात ,महाआघाडीच्या  ड्रायव्हरकडे लर्निंग लायसन्सही नाही

सरकारनामा
सोमवार, 17 डिसेंबर 2018

विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत राहुल गांधी यांचे एकत्रित छायाचित्र पाहणे भाजपला विचलित करू शकते.  -एक ट्विट 

 

दिल्ली ः कॉंग्रेस पक्षाच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीस देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने नव्या चर्चेला आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे.

विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत राहुल गांधी यांचे एकत्रित छायाचित्र पाहणे भाजपला विचलित करू शकते.  -एक ट्विट 

 

दिल्ली ः कॉंग्रेस पक्षाच्या तीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीस देशभरातील विविध पक्षांचे नेते उपस्थित राहिल्याने नव्या चर्चेला आणि नव्या वादाला तोंड फुटले आहे.

राहुल गांधी यांनी राजस्थानहून मध्यप्रदेशकडे जाताना एक छायाचित्र ट्‌विट केले आहे. या छायाचित्रात एका बसमध्ये राहुल गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे बाजूबाजूला बसलेले आहेत.

तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जनता दलाचे नेते शरद यादव, द्रमुकचे स्टालिन, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुख अब्दुला आदी नेतेही बसमध्ये बसलेले दिसत आहेत. 

राहुल गांधी यांनी या ट्विटमध्ये मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या काँग्रेस कार्यकर्त्यांचे आभार मानताना त्यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे . 

या छायाचित्राबाबत भाजपचे नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी ट्‌विट केले असून त्यामध्ये राहुल गांधी यांना उद्देशून असे म्हटले आहे की, "महाआघाडीच्या वाहनात ड्रायव्हरच्या जागेवर बसलेल्या व्यक्तीकडे साधे लर्निंगचे लायसन्ससुद्धा नाही. बचाले ए मौला ए राम, गटबंधनका क्‍या होगा अंजाम.''

 

ट्‌विटरवर अनेकांनी राहुल गांधीच्या ट्‌विटला रिट्‌विट केले आहे आणि त्यांचे अभिनंदन केले आहे. एका ट्‌विटमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याने असा वैधानिक इशारा दिला  आला आहे की, विरोधी पक्षांच्या नेत्यांसमवेत राहुल गांधी यांचे एकत्रित छायाचित्र पाहणे भाजपला विचलित करू शकते.

आजच्या शपथ विधी सोहळ्याला तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी , बसपाच्या नेत्या मायावती , समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश सिंग , आपचे नेते अरविंद केजरीवाल आदी नेते गैरहजर होते त्याबाबतही ट्विटरवर चारचा सुरु आहे . 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख