Mrs> Jagtap takes care of Rahul Jagtap | Sarkarnama

आमदार साहेब, खासदार नक्की होणार, पण तब्येतची काळजी घ्या

मुरलीधर कराळे
शनिवार, 20 एप्रिल 2019

.

नगर :  रखरखतं उन, डोक्यावर टोपी नाही की उन्हापासून संरक्षण करणारे कापड नाही. मतदानाचा जोगवा माघत गेल्या महिन्यांपासून उमेदवार घरातून सकाळीच बाहेर पडत आहेत.

दिवसभर फिरून मते मागून रात्री उद्याचे नियोजन, आणि विरोधकांच्या खेळीवर अभ्यास करताना दिसत आहेत. उमेदवारांच्या पत्नीही प्रचारासाठी दिवसभर शहर,गावे पिंजून काढत आहेत.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व त्यांच्या पत्नी शितल जगताप यांचा एक फोटो व्हायरल झाला. शितल जगताप यांनी आमदार जगताप यांच्या खांद्यावरील पंचा नीटनेटका केला.

हसत-हसत त्या म्हणाल्या  , आमदार साहेब, खासदार नक्की होणार, पण उन खूप वाढलंय, तब्येतीचीही जरा काळजी घ्या अन पक्षाचे चिन्ह वर ठेवा. आमदारांनीही त्यांला हसतच उत्तर दिले. दोघे कितीही प्रचारात व्यस्त असले, तरी पतीची काळजी पत्नीला असतेच. तेच या छायाचित्रातून विषद होत आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख