'एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलल्या 

राज्यात 'कोरोना' रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 'एमपीएससी'ने या परीक्षा स्थगीत केल्या आहेत.
mpsc
mpsc

पुणे : 'कोरोना'चा प्रभाव वाढत असल्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एप्रिल व मे महिन्यात होऊ घातलेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत. पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे स्पष्ट केले आहे. 

'एमपीएससी'ने मार्च रोजी परिपत्रक काढून 'राज्य सेवा पूर्व परीक्षा ' एप्रिल रोजी तर 'महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब, संयुक्त पूर्व परीक्षा ' ही मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले होते. राज्यात 'कोरोना' रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढविला जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 'एमपीएससी'ने या परीक्षा स्थगीत केल्या आहेत. 

परीक्षेचे सुधारीत वेळापत्रक 'एमपीएससी'च्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. तसेच अर्ज भरलेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे याबाबत माहिती दिली जाईल, असे 'एमपीएससी'ने स्पष्ट केले आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

नागपुरात कोरोनाचा पहिला बळी 
नागपूर : मेयो रुग्णालयात गेल्या एप्रिलपासून उपचार घेत असलेला सतरंजीपुऱ्यातील बडी मशीद परीसरातील रहीवासी वर्षीय वृद्ध उपराजधानीतील कोरोनाचा पहीला बळी ठरला. रविवारी मध्यरात्रीनंतर त्याचा मृत्यू झाला.

पण काल त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. नागपुरात कोरोनाचा पहीला बळी गेल्यानंतर नागरीक हादरले आहेत. आतातरी स्वयंशिस्त पाळल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दिल्ली ते नागपूर प्रवास करुन आल्यानंतर आमदार निवासाच्या विलगीकरण कक्षातील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल काल प्राप्त झाला. कोरोनाने मृत्यू झालेल्या वृद्धाला एप्रिलला मेयोत भरती करण्यात आले होते. रविवारी नमुने तपासणासाठी पाठवण्यात आले. त्याचा अहवाल सोमवारी म्हणजे काल मिळाला. पण अहवाल येण्यापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाला. 

दिल्लीच्या मरकजहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले जाते. मरकजहून आलेल्या नागरिकांचा जत्था शहरात फिरत असल्याची चर्चा मेयोच्या वर्तुुळात आहे. याबाबत मनपाचे अधिकारी, पोलिसांना कळविले असून, आज मृताचे नातेवाईक तसेच संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करुन त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे भरती केल्यानंतर कुटुंबातील कुणीही त्यांची विचारपूस करण्यास रुग्णालयात आले नसल्याचे मेयो प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com