mp win congress | Sarkarnama

मध्यप्रदेशातही पंजा कॉंग्रेस 114 तर भाजप 109 जागा 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 12 डिसेंबर 2018

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्यप्रदेशमध्येही कॉंग्रेसने भाजपशी जोरदार टक्कर देत सर्वाधिक म्हणजेच 114 जिंकल्या असून भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा मॅजिक फिगर कॉंग्रेस गाठू शकली नाही. केवळ दोन आमदारा बहुमतासाठी कमी पडले आहेत. 

पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या मध्यप्रदेशमध्येही कॉंग्रेसने भाजपशी जोरदार टक्कर देत सर्वाधिक म्हणजेच 114 जिंकल्या असून भाजपला 109 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा मॅजिक फिगर कॉंग्रेस गाठू शकली नाही. केवळ दोन आमदारा बहुमतासाठी कमी पडले आहेत. 

राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसने बाजी मारत भाजपला चित केले मात्र मध्यप्रदेशमध्ये भाजप आपली सत्ता राखेल असे बोलले जात होते. सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत मतमोजणीचा घोळ सुरू होता. शेवटी 230 जागांचे निकाल जाहीर झाले असून कॉंग्रेसने सर्वाधिक 114, भाजप 109, मायावती दोन इतर पाच असे उमेदवार निवडून आले आहे. 

कॉंग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्याचे जाहीर होतात मंगळवारच्या रात्री राजकीय नाट्य तेथे घडले. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्वीजयसिंग, कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी राज्यपालांना पत्र पाठवून सत्तेसाठी दावा केला. पण, राज्यपालांनी त्यांना अधिकृतरित्या निकाल जाहीर तर होऊ द्या त्यानंतर पाहू असे सांगितले. 

भोपाळमध्य पत्रकारांशी बोलताना कमलनाथ म्हणाले, की मी खूप आनंदी आहे. कॉंग्रेसकडे बहुमत आहे. त्यामुळे येथे आमचेच सरकार येणार आहे. कॉंग्रेसने काही अपक्षांशी बोलणी केली असून जरी मायावतीनी पाठिंबा दिला नाही तरी दोन अपक्षांनी साथ दिल्यास मध्यप्रदेशात कॉंग्रेस सहज सत्ता स्थापन करू शकते. 

मध्यप्रदेशमध्ये भाजपने थोडी लाज राखण्यात यश मिळविले आहे. मध्यप्रदेशात भाजप येते की कॉंग्रेस हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगता येत नव्हते.कधी भाजप पुढे तर कधी कॉंग्रेस मागे. कधी कॉंग्रेस पुढे तर भाजप मागे. असे चित्र काल दिवसभर सुरू होते. त्यामुळे देशाचे या राज्यांकडे लक्ष लागून राहिले होते. शेवटी कॉंग्रेसने 114जागा जिंकत भाजपला मागे टाकल्याचे स्पष्ट झाले आहे. 
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख