MP Vikas Mahatme Diverted MP Fund for Corona FIght | Sarkarnama

कोरोनाच्या नियंत्रणासाठी खासदार डॉ. विकास महात्मे यांनी दिले 50 लाख

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी  50 लाख रूपयांचा निधी नागपुर जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे

नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमिवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्याकरिता राज्यसभा खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी  50 लाख रूपयांचा निधी नागपुर जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. गुरुवारी त्यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना एक पत्र लिहून कोरोना विषाणूची रोकथाम, प्रतिबंध व उपचार यासाठी वैद्यकीय उपकरणे, टेस्टिंग किट,आरोग्य कर्मिनां लागणारे अत्याधुनिक ड्रेस, मास्क, व सॅनिटायझर्स इत्यादी आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध  करुन दिला आहे.

खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला यातून मदत होणार आहे. ही महामारी रोखण्यासाठी संपूर्ण देशाने एकवटून पुढे येण्याची गरज असल्याचे आवाहन खासदार डॉ. महात्मे यांनी सर्वांना केले आहे. ''संकटाच्या या घटनेत केंद्र व राज्य सरकार पीडितांवर योग्य उपचार होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लोकांनाही जागरूक करण्याची गरज आहे. सामान्य लोकांना घरात राहण्याची गरज समजून घेतली पाहिजे. विनाकारण घराबाहेर पडू नका. या साथीने गरीब - श्रीमंत सगळ्यांनाच त्रस्त केले आहे. सध्या तरी social distancing हाच एक मार्ग सयुक्तिक वाटतो. आपल्या सभोवतालच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष द्या. केंद्र व राज्य सरकार चांगली कामे करीत आहेत,'' असे सांगत खासदार महात्मे संसदेच्या अधिवेशना नंतर  दिल्लीहून परत येताच नागपुरात कोरोनाविरूद्धच्या लढ्यात सक्रिय झाले. 

काल दिवसभरात त्यांनी विविध विभागांच्या अधिका-यां कडून  माहिती घेतली आणि कोरोनाशी लढण्याचा अॅक्शन प्लान तयार केला. तद्नतर  आपली मते व सूचना त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन , केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक अधिका-यां कडे ईमेलने पाठविल्या. काल ते पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि आरोग्य व प्रशासकीय अधिकारी यांचे समवेत कोरोनाच्या प्रतिबंधाच्या तयारीची पाहणी करण्या साठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि मेयो रुग्णालयात दाखल झाले. तत्पूर्वी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्या  सूचनांबाबत त्यांच्यासोबत चर्चा केली .

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे. या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना तात्काळ आरोग्य सेवा मिळावी आणि प्रशासनालाही निगडीत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्या, यासाठी  खासदार पद्मश्री डॉ विकास महात्मे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीमधून 50 लाखाचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात यावा, अशी सूचना केली आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख