कोरोना इफेक्ट : उदयनराजेंनी घेतली स्टॅण्डींग मिटींग

सध्या जिल्ह्यात कोरोनाचे १६ रूग्ण झाले असून यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक सहा रूग्ण आहेत. रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागेल्याने जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे सुरू झाली आहे.
Standing Meeting
Standing Meeting

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण गेल्या दोन दिवसांत अचानक वाढल्याने प्रशासकिय यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जिल्हा रूग्णालयातील कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची जलमंदीर पॅलेस या निवासस्थानी स्टॅण्डींग बैठक घेतली. या बैठकीत
त्यांनी डॉक्टरांना येत असलेल्या अडचणी, रूग्णालयातील समस्या जाणून घेतल्या. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक लॉकडाऊन सुरू आहे. या सर्व परिस्थितीत साताऱ्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले नेमके काय करतात, यासंदर्भात सरकारनामावर वृत्त प्रसिध्द झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आज उद्यनराजेंनी जलमंदीर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधला. 


सध्या जिल्ह्यात कोरोनाचे १६ रूग्ण झाले असून यामध्ये कऱ्हाड तालुक्यात सर्वाधिक सहा रूग्ण आहेत. रूग्ण संख्या दिवसेंदिवस वाढू लागेल्याने जिल्ह्याची वाटचाल रेड झोनकडे सुरू झाली आहे. तर प्रशासनानेही निर्बंध कडक करण्यास सुरवात केली आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा रूग्णालयातील डॉक्टरांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

संबंधित डॉक्टर हे कोरोना बाधित तसेच संशयित रूग्णांवर उपचार करतात. जिल्हा रूग्णालयात कोरोनाच्या रूग्णांवर उपचार करताना कोणत्या अडचणी येतात.
कोरोना रूग्णावर उपचार करताना सुरक्षिततेच्या सर्व उपाय योजना आहेत का, डॉक्टरांना सुरक्षा किटस्‌ उपलब्ध आहेत का, जिल्ह्यात रूग्णांची स्थिती काय आहे,
यासंदर्भातील माहिती घेतली. तसेच कोरोना रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे कौतूकही त्यांनी केले.

ग्रामीण भागातील संशयित रूग्णांना तसेच होम कोरंटाईनमध्ये असलेल्या व्यक्तींना योग्य प्रकारे उपचार मिळतात का, याचीही माहिती त्यांनी घेतली. जिल्हा
रूग्णालयात वैद्यकिय अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याची कारणे जाणून घेतली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com