खासदार सुप्रिया सुळेंचा मंगळवारी नाशिकला नागरिकांशी संवाद

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे उद्या (ता. २७ ) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्या नाशिकसह नांदगावला मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यांच्या या संवाद दौ-यात विधानसभा निवडणुकीचा चाचपणी होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळेंचा मंगळवारी नाशिकला नागरिकांशी संवाद

नाशिक  : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या खासदार सुप्रिया सुळे  उद्या (ता. २७ ) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी त्या नाशिकसह नांदगावला मतदार, कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. त्यांच्या या संवाद दौ-यात विधानसभा निवडणुकीचा चाचपणी होणार आहे.

या दौऱ्याच्या नियोजनाबाबत नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यालय मुंबई नाका येथे आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आमदार हेमंत टकले, प्रदेश पदाधिकारी विश्वास ठाकूर,शहराध्यक्ष रंजन ठाकरे,जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, अर्जुन टिळे, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, लक्ष्मण मंडाले, सोमनाथ बोराडे, राजाराम धनवटे, महेश भामरे, अंबादास खैरे,संतोष सोनपसारे, संजय खैरनार, दत्ता पाटील,कैलास मुदलीयार आदी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे उद्या सकाळी साडे नऊला अंबर येथील भोळे मंगल कार्यालय येथे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक होणार आहे. सकाळी अकराला राष्ट्रवादी कार्यालय मुंबई नाका येथे नाशिक शहर, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता नांदगाव येथे नांदगाव विधानसभा मतदारसंघाची बैठक होणार आहे. या बैठकीस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com