कनिका कपूरमुळे खासदार मेंढे यांच्या हातावर पडला हा शिक्का! #KanikaKaCoronaCrime

महाराष्ट्रातील दोन खासदार होम क्वारंटाईन
kanika--mendhe
kanika--mendhe

भंडारा : भंडारा- गोंदियाचे खासदार सुनील मेंढे यांनी स्वतःला विलगीकरण घेतले आहे. यासाठी कारण हे कनिका कपूरच ठरली आहे. महाराष्ट्रातील दोन खासदार कनिकामुळे आणि त्यानंतरच्या साखळीमुळे अडचणीत आले आहेत.

कृपाल तुमाने यांच्यानंतर मेंढे यांनीही विलगीकरण करून घेतले आहे. विशेष म्हणजे नगराध्यक्ष म्हणून त्यांच्याविरोधात झालेल्या अविश्वास ठरावावर जिल्हाधिकाऱ्यांकडे मेंढे यांची सुनावणी होती. आपण दुष्यंतसिंह यांना भेटल्याचे त्यांनी स्वतःहून जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. तसेच त्यांनी  home quarantine चा शिक्का मारून घेतला.

कोरोनाचा संसर्ग झालेली बॉलिवूड गायिका कनिका कपूर हिच्या संपर्कात आलेले भाजप खासदार दुष्यंतसिंह संसदेतही उपस्थित राहिल्याचे उघड झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे कोरोनाची दहशत देशाच्या कायदेमंडळापर्यंत पोहोचली आहे. येथूनच महाराष्ट्रातील एका शिवसेना खासदाराला लागण झाल्याची शक्‍यता निर्माण झाल्याने त्यांनी स्वत:ला "होम क्वारंटाईन" केले आहे. 

राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे पुत्र असलेले दुष्यंतसिंह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही भेटले होते. लखनौ येथे मागील आठवड्यात रविवारी गायिका कनिकाने मेजवानी आयोजित केली होती. या पार्टीत बडे राजकीय नेते, सनदी अधिकारी उपस्थित होते. वसुंधरा राजे, लोकसभा खासदार दुष्यंतसिंह हेदेखील या पार्टीत सहभागी झाल्या होत्या. 

कनिका कपूर कोरोना विषाणू संक्रमित असल्याचे आढळून आल्यानंतर या पार्टीतील उपस्थितांकडे संशयाची सुई वळली असून, दुष्यंतसिंह यांच्या सहभागाच्या माहितीनंतर खळबळ निर्माण झाली आहे. दुष्यंतसिंह त्वरित विलगीकरण कक्षात गेले आहेत. मात्र त्याआधी त्यांनी दोन दिवस संसदेत उपस्थिती लावली होती. 

संसद भवनात आणि मध्यवर्ती कक्षातही (सेंट्रल हॉल) दुष्यंतसिंह हे अन्य खासदारांना भेटले होते. लोकसभेमध्ये दुष्यंतसिंह यांच्या शेजारी बसणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही चिंता व्यक्त करताना दुष्यंतसिंह स्वेच्छेने विलगीकरण कक्षात गेल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार कृपाल तुमाने यांची देखील दुष्यंतसिंह यांच्याशी भेट झाली होती. त्यामुळे तुमाने यांनी स्वत:ला "होम क्वारंटाईन" केले आहे. या वृत्ताला त्यांच्या स्वीय सहाय्यकाने दुजोरा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com