खासदार मेंढेंनी होम क्वारंटाईनमधून निघताच घेतले रक्तदान शिबीर!

दुष्यंत सिंह यांच्यामुळे संसदेत कोरोना पोचल्याचे कळताच देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जगभरात कोरोनाची दहशत दिवसागणिक वाढत असताना शेजारच्या गोंदिया जिल्ह्यालाही कोरोनाने सोडले नाही
mp sunil mendhe corona
mp sunil mendhe corona

भंडारा : कोरोनाचा संसर्ग झालेली बाॅलीवुड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेले खासदार दुष्यंत सिंह संसदेतही उपस्थित होते. त्यांच्या संपर्कात भंडारा-गाेंदीयाचे खासदार सुनील मेंढेही आले होते. त्यानंतर हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन घेत मेंढेही होम क्वारंटाईन झाले होते. आज त्यांच्या होम क्वारंटाईन कालावधी समाप्त होताच घराबाहेर निघून त्यांनी रक्तदान शिबिर घेत कामाला सुरुवात केली आहे. 

खासदार दुष्यंत सिंह यांच्यामुळे संसदेत कोरोना पोचल्याचे कळताच देशभर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जगभरात कोरोनाची दहशत दिवसागणिक वाढत असताना शेजारच्या गोंदिया जिल्ह्यालाही कोरोनाने सोडले नाही.भंडारा जिल्हा मात्र कोरोनातून सुटला. याचा आनंद भंडारावासीयांच्या चेहऱ्यावर येण्याआधीच खासदार मेंढे होम क्वारंटाईन झाले. त्यामुळे जिल्हावासी काळजीत पडले. पण तेवढेच सावधही झाले. त्यामुळेच की काय भंडाऱ्यात आजपर्यंत कोरोनाचा संसर्ग झाला नाही. कोरोनाची लागण झालेली प्रसिद्ध बाॅलिवूड गायिका कनिका कपूरच्या संपर्कात आलेले भाजप खासदार दुष्यंत सिंह संसदेत उपस्थित राहिल्यानंतर देशभर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे तेव्हा त्यांच्या संपर्कात आलेले विदर्भातील खासदार सुनील मेंढे आणि रामटेकचे शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने होम क्वारंटाईन झाले होते. यांपैकी सुनील मेंढे आज घराबाहेर पडले आणि रुग्णांच्या उपचारासाठी रक्ताची वाढती गरज आणि सद्यस्थितीत असलेला तुटवडा पाहता सर्वात आधी त्यांनी रक्तदान शिबिर घेतले. 

भंडारा शहरातील बहिरंगेश्वर मंदिरात आज त्यांनी रक्तदान शिबीर घेतले. यामध्ये 40  ते 50 लोक सहभागी झाले होते. यावळी सोशल डिस्टसींगचे पूर्णतः पालन करुन सर्वतोपरी काळजी घेतल्याचे बघायला मिळाले. खासदार मेंढे सक्रिय झाले असले तरी आणखी काही दिवस त्यांनी स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला त्यांना डाॅक्टरांनी दिला आहे. ते सुद्धा सामाजिक अंतर राखण्यासोबत सर्व काळजी घेत आहेत. रक्ताचा तुटवडा भासत असल्यामुळे आजचे शिबिर घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपण स्वतःसह मतदारसंघातील जनतेचीही काळजी घेणार असल्याचेही ते म्हणाले. 
----------------------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com