MP Shrirang Barne Nephew Interested in Chinchwad Constituency | Sarkarnama

भाजपच्या आमदारांविरोधात चिंचवडला शिवसेना खासदार बारणेंचे पुतणे इच्छुक

उत्तम कुटे
गुरुवार, 12 सप्टेंबर 2019

पिंपरीःयुतीची औपचारिक घोषणाच काय ती बाकी असली,तरी दुसरीकडे शिवसेना, भाजपची गतवेळेसारखी विधानसभेला स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरु आहे. त्यातूनच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनंतर शिवसेनेनेही मंगळवारी (ता.११)आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातही  भाजपचे आमदार असलेल्या चिंचवड मतदारसंघातून थेट जिल्हाप्रमुख व पालिकेचे गटनेत्यांसह तिघांनी त्या दिल्या आहेत.

पिंपरीःयुतीची औपचारिक घोषणाच काय ती बाकी असली,तरी दुसरीकडे शिवसेना, भाजपची गतवेळेसारखी विधानसभेला स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरु आहे. त्यातूनच पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपनंतर शिवसेनेनेही मंगळवारी (ता.११)आपल्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातही  भाजपचे आमदार असलेल्या चिंचवड मतदारसंघातून थेट जिल्हाप्रमुख व पालिकेचे गटनेत्यांसह तिघांनी त्या दिल्या आहेत.

शहरात तीनपैकी एकेक आमदार (चिंचवड व पिंपरी) युतीचा आहे. तिसरे (भोसरी) भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.त्यामुळे युती झाली,तरच विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाकडे राहणार आहेत. मात्र, गेल्यावेळसारखी ऐनवेळी युती झाली नाही, तर नामुष्की होऊ नये म्हणून यावेळी शिवसेना सावध आहे. त्यांनी एकला चलो रे चीही तयारी केली आहे.त्यातूनच त्यांनी शहरातील सर्व तिन्ही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती काल मुंबईत घेतल्या. राज्यातील या मुलाखतींना कालच सुरवात झाली.

चिंचवड या शहरातील सर्वात मोठ्या मतदारसंघामध्ये भाजपचे शहराध्यक्ष असलेले लक्ष्मण जगताप आमदार आहेत. तेथून त्यांच्या उमेदवारीची घोषणाच काय ती बाकी आहे. दुसरीकडे युतीचंही ठरल्यात जमा आहे. फक्त घोषणा बाकी आहे. तरीही चिंचवडच्या इच्छूकांच्या मुलाखती शिवसेनेने घेतल्या. तेथून जिल्हाप्रमुख (मावळ) व मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर पाठीराखे गजानन चिंचवडे, पालिकेतील गटनेते राहुल कलाटे,नगरसेवक निलेश बारणे यांनी मुलाखती दिल्या. कलाटे यांनी गतवेळी चिंचवडमधून विधानसभा लढविली होती. त्यांना दुसऱ्या क्रमाकांची मते मिळालेली आहेत. तर, निलेश हे खा. बारणेंचे सख्खे पुतणे आहेत. लोकसभा निवडणुकीला खा. बारणे व आ. जगताप यांचे दहा वर्षाचे कट्टर वैर संपुष्टात आलेले आहे.

युती जवळपास ठरल्यात जमा असूनही भाजपचा आमदार असलेल्या मतदारसंघात पक्षाने का मुलाखती घेतल्या या 'सरकारनामा'ने विचारलेल्या प्रश्नावर मागच्यासारखी (२०१४) परिस्थिती आली,तर असे उत्तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चिंचवडे यांनी दिले. म्हणून आम्ही यावेळी तयारीत असून युतीचा आदेश आला,तर तो पाळून युतीधर्मही निभावणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच या तयारीचा फायदा युती झाली,तर मित्रपक्ष भाजपलाच होणार असल्याचे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख