mp shirole`s woke late but straight | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

खासदार शिरोळे यांचे काम लेट पण थेट : नगरसेवकांची टिप्पणी

उमेश घोंगडे
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

पुणे : महापालिका असो वा लोकसभा कोणताही विषय अभ्यासपूर्वक मार्गी लावण्याची होतोटी असलेले पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या कामाच्या पद्धतीबाबत त्यांच्या पक्षाच्या नगरसेवकांनी पुण्यातील एका कार्यक्रमात मार्मिक टिप्पणी केली. शिरोळे यांचे काम लेट असते पण थेट असते, या कौतुकाच्या वाक्याला स्वत: शिरोळे यांनीही हसून दाद दिली. 

खासदार शिरोळे यांच्या पुढाकराने बांधण्यात आलेल्या "ई-टॉयलेट'चे उदघाटन नुकतेच पुण्यात झाले. या कार्यक्रमात काही नगरसेवक व पुण्यातील पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर मुक्ता टिळकदेखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

यावेळी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी खासदार शिरोळे यांच्या कामाचे कौतुक केले. कौतुक करताना खासदार शिरोळे यांचे काम थोडे लेट असते. मात्र थेट असते या शब्दात त्यांचा उल्लेख करण्यात येत होता. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी याच पद्धतीने उल्लेख केल्याने उपस्थितांमध्ये हा चर्चेचा विषय ठरला. 

कोणत्याही वादात न अडकता शांतपणे आणि सरळपणे आपले काम करीत राहावे हा खासदार शिरोळे यांचा स्वभाव आहे. अनेक वर्षांची त्यांची ही कामाची पद्धत आहे. त्यांच्या या स्वभावाचा उल्लेख प्रत्येकजण करीत होता. मात्र हे करताना खासदारसाहेब थोडे लेट आहेत हा सहजपणे केलेला उल्लेख उपस्थितांमधील चर्चेला कारण बनत होता. मुळात ज्यांनी अशाप्रकारे उल्लेख केला. त्यांनी तो शिरोळे यांचे वेगळेपण सांगण्यासाठी सकारात्मक दृष्टीकोनातून केलेला होता. कोणतीही गोष्ट करताना घाई न करता प्रश्‍न समजून घेऊन, त्यावर शांतपणे विचार करून निर्णय घ्यायचा ही त्यांच्या कामाची पद्धत असल्याचा उल्लेख यावेळी करण्यात आला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख