लाॅकडाऊनचा असाही उपयोग : खासदार संजयकाकांनी  घटवले एवढे वजन! - MP Sanjaykaka Patil looses his weight in corona lockdown | Politics Marathi News - Sarkarnama

लाॅकडाऊनचा असाही उपयोग : खासदार संजयकाकांनी  घटवले एवढे वजन!

अजित झळके
रविवार, 26 एप्रिल 2020

कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे घराबाहेर पडणे सर्वांनाच अवघड झाले आहे. त्याचा चांगला उपयोग नेत्यांनी करून घेत प्रकृतीकडे लक्ष दिले आहे. 

सांगली : सत्ता कुणाचीही असली तरी आपले राजकारणातील वजन कायम ठेवणाऱ्या खासदार संजयकाका पाटील यांनी आपले शारिरीक वजन मात्र घटवले आहे. त्यांनी योगासन, प्राणायाम, बैठका आणि नियमित चालणे या व्यायामांनी त्यांनी स्वतःला अधिक फिट केले आहे. त्यांचे वजन गेल्या महिनाभरात अडीच किलोने कमी झाले आहे. "आता मला जुने शर्ट आणि टी-शर्ट बसताहेत, ते घालून तरुणपणाचा फिल येतोय', असे त्यांनी सांगितले.

संजयकाकांनी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर "गड्या आपला गाव बरा' म्हणत तासगाव चिंचणी गाठली. तेथील घरात दीर्घकाळाने सहकुटुंब सहपरिवार सारेच इतक्‍या जास्त दिवसांसाठी एकत्र आलेत. त्यामुळे गावकऱ्यांच्या भेटीगाठी हा कार्यक्रम सुरुच आहे, मात्र सुरक्षित अंतर राखून. पहिले पंधरा दिवस कडक शिस्त पाळल्यानंतर संजयकाकांनी घरातून बाहेर पडत भेटीगाठी घेतल्या.

सांगलीत परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्यासोबतच्या बैठकीला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी सिंचन योजनांवर लक्ष केंद्रीत केले. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनेच्या आवर्तनांची माहिती, कुठले तलाव भरायचे, कुठल्या ओढ्यात पाणी सोडायचे याचे नियोजन केले. त्यासाठी त्यांनी कॉलेज युवकांप्रमाणे रंगीत शर्ट, टी-शर्ट, जीन्स परिधान केले. स्वतः दुचाकी चालवत बांधाबांधावरून ते फिरत आहेत. 

या काळात सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांनी स्वतःचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोज दीड ते दोन तासाचा वेळ काढला आहे. पहाटे लवकर उठून चालायला जाणे, योगासन, प्राणायाम करणे असे व्यायाम ते करत आहेत. ते म्हणाले, ""या काळात अडीच किलोने वजन कमी झाले आहे. जुने शर्ट आता एकदम मस्त बसताहेत. त्यामुळे एक वेगळा फील येतोय. आता पाणी योजनांचा आढावा घेत सर्व तालुक्‍यातून दौरा करणार आहे. गर्दी टाळण्यासाठी त्याचे वेळापत्रक मात्र जाहीर केले जाणार नाही.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख