उद्धव ठाकरेंना संजय राऊतांकडून नवी उपाधी.....हिंदूप्रजापती!

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून ओळखले जात. त्यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. शिवसेना प्रमुख एकच असे सांगत उद्धव यांनी स्वतःला 'शिवसेना पक्ष प्रमुख' असे म्हणवून घ्यायला सुरुवात केली. आता उद्धव यांना नवी उपाधी देण्यात आली आहे 'हिंदूप्रजापती'!
Shivsena Chief Uddhav Thakrey Get New Name Hindu Prajapati
Shivsena Chief Uddhav Thakrey Get New Name Hindu Prajapati

मुंबई : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख म्हणून ओळखले जात. त्यांच्या नंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची सूत्रे हाती घेतली. शिवसेना प्रमुख एकच असे सांगत उद्धव यांनी स्वतःला 'शिवसेना पक्ष प्रमुख' असे म्हणवून घ्यायला सुरुवात केली. आता उद्धव यांना नवी उपाधी देण्यात आली आहे 'हिंदूप्रजापती'!

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अयोध्या प्रकरणावर निकाल दिला. त्यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या अधिकृत फेसबूकवरच उद्धव ठाकरे यांचा 'हिंदूप्रजापती' असा उल्लेख करण्यात आला आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदूंचा आवाज बुलंद ठेवणारा एकमेव वाघ 'हिंदूप्रजापती' शिवसेना प्रमुख श्री. उद्धवसाहेब ठाकरे असे लिहिलेले पोस्टर राऊत यांनी आपल्या फेसबूक पेजवर पोस्ट केले आहे. 

पहले मंदिर फिर सरकार!!!
#अयोध्या_में_मंदिर
#महाराष्ट्र_मे_सरकार...
जय श्रीराम !!! ...........असे सांगत त्या दिवशी राऊत यांनी महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षावरही भाष्य केले आहे. आता उद्धव ठाकरेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशा हालचालीही सुरु झाल्या आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com