`तिकडे दादा असूद्यात...इकडेपण दादा, भाऊ आणि नाना आहेत....`

पुण्यात नवीन शहराध्यक्ष आज भाजपने नेमला. त्यावेळी खासदार संजय काकडे यांनी जोरदार बॅटिंग केली...
`तिकडे दादा असूद्यात...इकडेपण दादा, भाऊ आणि नाना आहेत....`

पुणे : महापालिका निवडणुकीत गेल्यावेळी प्रमाणे पुढच्यावेळीदेखील आपण प्रचंड यश मिळवू. आपले शंभर नगरसेवक येत्या निवडणुकीतही निवडून आणू, असा निर्धार करीत जगदीशराव इतर पक्षांत दादा कुणीही असले तरी तुझ्याकडेही दादा, भाऊ आणि नाना आहेत. त्यामुळे पुढच्यावेळीदेखील आपले शंभर नगरसेवक निश्‍चितपणे निवडून येतील, असा धीर भारतीय जनता पार्टीचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी पक्षाचे नवे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना दिला.

भाजपाच्या संघटन पर्वात पुण्यात आज शहर पातळीवरील मेळावा झाला. या मेळाव्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, मावळत्या शहराध्यक्ष आमदार माधुरी मिसाळ, नवनियुक्त शहराध्यक्ष जगदीश मुळीक तसेच खासदार संजय काकडे उपस्थित होते.

या मेळाव्यात बोलताना खासदार काकडे यांनी पुणे महापालिकेतील सत्तेचा उल्लेख करीत शहराध्यक्ष मुळीक यांना धीर दिला. ते म्हणाले, " महापालिकेत सध्या जशी सत्ता आहे. त्याचप्रमाणे येत्या निवडणुकीतही भाजपाला सत्तेत आणण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज आहे. इतर पक्षात दादा असले तरी आपल्या पक्षातही दादा, भाऊ व नाना आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीतही आपण शंभर नगरसेवक निवडून आणून पुन्हा सत्तेत येणार आहोत.''

भाजपचे दादा म्हणजे चंद्रकांतदादा, भाऊ म्हणजे खासदार गिरीश बापट आणि नाना म्हणजे स्वतः संजय काकडे, असे त्रिकूट पुण्यात काम करणार असल्याचे काकडे यांनी यानिमित्ताने सांगितले. 

सत्तेच्या बदलत्या समीकरणात पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी सूत्रे हातात घेतली आहे. अजित पवार हे त्यांच्या कामाच्या पद्धतीने झपाट्याने कामास लागले आहेत. पुणे व पिंपरी महापालिकेच्या आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या निवडणुकीची तयारी त्यांनी आतापासूनच केली आहे. या पार्श्‍वभूमीवर आजच्या मेळाव्यात खासदार काकडे यांनी केलेल्या वक्‍तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com