आजचे वाढदिवस : खासदार संजय जाधव, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने

खासदार संजय जाधव, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने यांचा आज वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय...
आजचे वाढदिवस : खासदार संजय जाधव, खासदार आनंदराव अडसूळ, खासदार कृपाल तुमाने

1. खासदार संजय जाधव (शिवसेना - परभणी) 
जन्म : 1 जुन, 1967. 
सर्वसामान्य शिवसैनिकापासून ते देशातील सर्वोच्य संस्थेचा सदस्य हा त्यांचा प्रवास अंत्यत संघर्षशिल राहिला आहे. परभणीकरांनी 'बंडू बॉस' ही पदवी दिली आहे. पक्षातील नेतेही त्यांना याच नावाने हाक मारतात. त्यांनी दोनवेळा परभणी विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले आहे. खासदार निधी खर्च करण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. विशेषत: मागील खासदारांचा शिल्लक निधी देखील त्यांनी जिल्ह्यातील विकास कामासाठी सत्कारणी लावला आहे. या निधीतून त्यांनी 59 कामे पूर्णत्वास गेली आहेत. अद्यापही 48 कामे प्रगती पथावर आहेत. मतदारसंघात मोफत पाणी पुरवठा त्यांच्यामार्फत केला जातो. नांदेड - पुणे एक्‍सप्रेस नियमित केली. 

 

2. आनंदराव अडसूळ, खासदार, अमरावती. 
जन्म दिवस ः 1 जुन 1947 

पाचव्यांदा लोकसभेत निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार आनंदराव अडसूळ यांना फक्त एकदाच पराभव पत्करावा लागला होता. मूळ सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्‍यातील असलेले आनंदराव अडसूळ मुंबईत स्थायिक झाल्यानंतर कामगार संघटनांच्या माध्यमातून शिवसेनेत आले. 1996 मध्ये त्यांनी बुलडाणा या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली व कॉंग्रेसचे मुकुल वासनिक यांचा पराभव केला. 1998 मध्ये अडसूळ यांचा पराभव झाल्यानंतर 1999 पासून मात्रे ते सातत्याने लोकसभेवर निवडून येत आहेत. 2009 व 2014 च्या निवडणुका त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून लढविल्या. अमरावती-पुणे रेल्वे, नरखेड-अमरावती रेल्वे मार्गाचे इलेक्‍ट्रीफिकेशन आदी कामासाठी त्यांनी पाठपुरावा केला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात 2002 ते 2004 या काळात केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केले. सध्या ते लोकसभेच्या रसायन व खते मंत्रालयाच्या स्थायी समितीचे सदस्य आहेत. 
 

3. खासदार कृपाल तुमाने  
जन्म : 1 जुन, 1965 
खासदार कृपाल तुमाने नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघातून 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार म्हणून निवडून आले. कॉंग्रेस सेवादलातून राजकीय वाटचाल सुरू करणाऱ्या कृपाल तुमाने यांनी 2009 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. लगेच त्यांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्या विरोधात निवडणूक लढवावी लागली. या निवडणुकीत त्यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला. त्यांनी रामटेक मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवला. 2014 च्या निवडणुकीत त्यांनी केंद्रीय मंत्री असलेल्या मुकुल वासनिक यांचा पराभव केला व लोकसभेत प्रवेश केला. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com