MP Sanjay Dhotre | Sarkarnama

खासदार संजय धोत्रे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 17 मार्च 2017

नागपूर : अकोला येथील भाजपचे खासदार संजय धोत्रे यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या खर्चाच्या तपशिलात तफावत असल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दाखल करून घेतली. लोकसभा निवडणुकीला जवळपास तीन वर्षे झाल्यानंतर हा याचिका दाखल करण्यात आली. 

नागपूर जिल्ह्यातील हिंगणी येथील श्रीकृष्ण अबडोल यांनी ही याचिका दाखल केली आहे. गेल्या 20 वर्षांपासून धोत्रे अकोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. न्या. भूषण धर्माधिकारी व न्या. स्वप्ना जोशी यांनी ही याचिका दाखल करून निवडणूक आयोग, खासदार संजय धोत्रे यांना नोटीस बजावली आहे. 

निवडणूक आयोगाने वेळोवेळी जारी केलेल्या अधिसूचनांचे पालन धोत्रे यांनी केले नाही. बॅंक खात्यातील व्यवहारावरही याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतले आहेत. बॅंक खात्यातील रक्कमेच्या स्त्रोताची माहितीही आयोगाला दिलेली नाही. यामुळे लोकप्रतिनिधित्व कायद्याचा भंग झाल्याचे याचिकेत म्हटले आहे. ही याचिका फेटाळून न लावता दाखल करून घेतल्याने खासदार धोत्रे यांना पुन्हा खर्चाचे न्यायालयात सादर करावे लागणार आहेत. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख