...आणि अगस्त्यच्या आईला एक दिवस का होईना सुटी मिळाली!

बीड : एरव्ही एक तर संसद किंवा मतदार संघात लोकांत असणाऱ्या खासदार डॉ. प्रितम मुंडे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या घरीच थांबून आहेत. मुलगा अगस्त्य, पती गौरव खाडे यांच्यासोबत त्या दिवस घालवत आहेत.
MP Pritam Munde Spared time with Husband Gaurav and Son Agastya
MP Pritam Munde Spared time with Husband Gaurav and Son Agastya

बीड : एरव्ही एक तर संसद किंवा मतदार संघात लोकांत असणाऱ्या खासदार डॉ. प्रितम मुंडे आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्युच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या घरीच थांबून आहेत. मुलगा अगस्त्य, पती गौरव खाडे यांच्यासोबत त्या दिवस घालवत आहेत. विशेषत: मुलगा अगस्त्यसोबत खेळत त्या त्याला दूरचित्रणवाणी दाखवून कोरोनाची माहिती देत आहेत.

कोरोना विषाणूचा फैलाव, त्यावर सुरु असलेल्या उपाय योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन आणि त्याला भेटत असलेला भरभरुन प्रतिसाद याची दृष्ये त्या मुलाला दाखवत आहेत. जगात या विषाणूमुळे होत असलेला हाहाकार आणि देशातील परिस्थितीबाबत त्याच्या बालमनाला कळेल असे समजावून सांगण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. सर्वांना सुटी असते आणि 'तुला का नसते' या अगस्त्यच्या नेहमीच्या प्रश्नाचे उत्तरही त्या आज त्याला देण्याचा प्रयत्न करत आहेत. 

लोकांसमोर असे प्रश्न असतात, त्यांचे प्रश्न संसदेत मांडून त्यावर उपाय योजना कराव्या लागतात म्हणून सुटी नसते असे त्याला समजावून सांगगत आहेत. सायंकाळी त्याच्यासोबत खिडकीत उभारुन टाळ्या वाजवून त्याला लोकांचे अभिनंदन करायला लावण्याचेही डॉ. प्रितम मुंडे यांचे नियोजन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com