धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालची 'डीपीसी' प्रितम मुंडेंनी टाळली?

तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांना तत्कालिन विरोधी पक्षनते धनंजय मुंडे देखील येत नसत. आता धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या बैठकीला खासदार प्रितम मुंडे अनुपस्थित राहिल्या
Pritam Munde Avoided Meeting Of Dhananjay Munde
Pritam Munde Avoided Meeting Of Dhananjay Munde

बीड : पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी घेतलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला खासदार डॉ. प्रितम मुंडे आल्याच नाहीत. विशेष म्हणजे आजच सकाळी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमासाठी त्या भगिनी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासोबत हजर होत्या.

मागच्या पाच वर्षांत तत्कालिन पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकांना धनंजय मुंडेही हजर नसत. एका बैठकीवेळी अगोदरच येऊन आपल्या मागण्यांचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देऊन मुंडे निघून गेले होते. दरम्यान, शुक्रवारी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर तिघे मुंडे एकत्र व्यासपीठावर होते. हा कार्यक्रम संपवून धनंजय मुंडे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. गडावर असलेल्या खासदार डॉ. मुंडे बैठकीला आल्या नाहीत. 

भाजपचे आमदार लक्ष्मण पवार व नमिता मुंदडा देखील बैठकीला नव्हते. श्री. पवार विम्यासंदर्भात झालेल्या बैठकीला मात्र हजर होते. या बैठकीत ३३६ कोटी ६९ लाख रुपयांच्या प्रारुप विकास आराखड्यास मान्यता देऊन ९९ कोटी रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाला सादर करण्याच्या प्रस्तावासही मान्यता देण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com